ऑनलाइन पद्धत:
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने देखील केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया करावी लागेल:
१. तुमच्या स्मार्टफोनमध्ये मेरा KYC आणि Aadhaar Face RD हे ॲप्स डाउनलोड करा.
२. ॲप उघडल्यानंतर तुमचे लोकेशन निवडा. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर महाराष्ट्र राज्य निवडा.
३. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका.
४. पुढील प्रक्रियेत तुमच्या चेहऱ्याचेVerification (फेस ऑथेंटिकेशन) केले जाईल.
५. यशस्वीVerification झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
त्यामुळे, ज्या रेशन कार्डधारकांनी अजूनही आपली केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पूर्वी ती पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळत राहील.