योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका विशिष्ट उद्योगाची योजना तयार करावी लागेल.
या उद्योगाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारला सादर करावा लागेल.
- सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची आणि लखपती दीदी योजनेसाठी केलेल्या अर्जाची सरकारद्वारे कसून पडताळणी केली जाईल.
- यासाठी महिला व बालविकास विभागाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.