https://twitter.com/i/status/1895859165526155377
कोह-ए-फिजा स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) विजेंद्र मार्स्कोले यांनी पुष्टी केली की,”हा व्हिडिओ त्याच दिवशी ऑनलाइन समोर आला. घटनास्थळी उपस्थितांनी त्यांच्या फोनवर हे कृत्य टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा, तिघांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. ही क्लिप वेगाने व्हायरल झाली ज्यामुळे डीसीपी (झोन-०३) रियाझ इक्बाल यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि ऐशबाग येथील रहिवासी रितिक यादवंशी (२४) आणि सुमित कुमार (२५) यांना अटक केली. पण या महिलेला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. स्टंटमध्ये वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांनी आरोपी चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणारे पत्र वाहतूक विभागाला लिहिले आहे