viral fight scene उत्तराखंडमधील देहरादून येथील सहस्त्रधारा पर्यटन स्थळावर तीन तरुण आणि दोन तरुणी यांच्यात झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओंची दखल पोलिसांनी तातडीने घेतली असून, रविवारी देहरादूनच्या राजपूर भागातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
तरुण-तरुणींची झटापट
या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणी एकमेकांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक तरुण एका तरुणीला जोरदारपणे ठोसा मारतो. त्यानंतर दुसरा तरुण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुसरी तरुणी त्याला दगड मारते. यानंतर, दुसरी तरुणी एका तरुणाला दगड मारताना दिसते आणि रागाच्या भरात त्याला काहीतरी बोलत आहे. ती त्या तरुणाला मारण्यासाठी धावते, तेव्हा इतर दोन तरुण मध्ये येतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
पहिली तरुणी त्या तरुणाच्या कानाखाली मारते आणि दोघी मिळून त्याला मारतात. त्या तरुणी इतक्या संतप्त झाल्या आहेत की, एक जण लाथा मारत आहे, तर दुसरी बेल्टने मारत आहे. यानंतर, तरुण त्या दोन्ही तरुणींना मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु इतर दोन तरुण पुन्हा मध्यस्थी करतात. दरम्यान, एक तरुण दुचाकीवरून येतो आणि भांडण करणारा तरुण त्याच्यासोबत निघून जातो. रागात असलेली एक तरुणी आपल्या मित्राला वाचवणाऱ्या तरुणालाही बेल्टने मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेबाबत माहिती देताना डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला सांगितले की, “शनिवारी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, हे तिघेही सहस्त्रधाराजवळ एका तरुणीला मारहाण करताना दिसत होते. त्यांच्या दोन स्कूटरच्या नोंदणी क्रमांकांच्या आधारे पोलिसांनी त्यांची माहिती काढली आणि त्यांना राजपूर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले.”
तीन जणांना अटक
अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे प्रमोद सिंग, आकाश सिंग आणि गौरव रावत अशी आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन तरुण आणि दोन तरुणी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसत आहे, परंतु या हाणामारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अटक केलेले सर्व पुरुष २० वर्षांचे असून ते उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.