crop insurance 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी १ हजार ४०० कोटी रुपये १४ एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
पिक विमा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
या भरपाईमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत धुळे, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पिक विमा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
विशेष बाब म्हणजे, यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के आगाऊ भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली होती. मात्र, यवतमाळमधील विमा कंपनीने यास नकार दिला. त्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना एकूण ७०५ कोटी रुपयांची आगाऊ भरपाई मिळणार आहे.
पिक विमा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
खरीप २०२४ च्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना चार प्रकारच्या नुकसानीसाठी भरपाई मंजूर झाली आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगांवर आधारित विमा भरपाई यांचा समावेश आहे. एकूण २ हजार ३०८ कोटी रुपयांच्या मदतीपैकी, १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७०६ कोटी रुपये, तर काढणीनंतरच्या नुकसानीसाठी १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपये मिळणार आहेत.