विविध प्रकारच्या नुकसानीसाठी मंजूर झालेली भरपाई खालीलप्रमाणे आहे:
- स्थानिक नैसर्गिक आपत्ती: १,४५५ कोटी रुपये
- हंगामातील प्रतिकूल परिस्थिती: ७०६ कोटी रुपये
- काढणी पश्चात नुकसान: १४१ कोटी रुपये
- पीक कापणी प्रयोग आधारित: १३ कोटी रुपये
कृषी विभागाने पुढे माहिती दिली की, १४ एप्रिलपर्यंत सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित ९०८ कोटी रुपयांपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत असून, ती देखील लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.