Fights viral video नोएडा येथील सोसायटीमधील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकदा महिलांमध्ये किरकोळ कारणांवरून बाचाबाची आणि हाणामारीच्या घटना घडतात. काही व्हिडिओमध्ये तर महिला अक्षरशः एकमेकांचे केस ओढताना, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना किंवा लाठ्या-काठ्यांचा वापर करताना दिसतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील दृश्येही अत्यंत धक्कादायक आहेत. ही घटना नोएडा सेक्टर १६७ मधील पारस सीझन सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांना ज्या प्रकारे मारत आहेत, ते पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेचे केस घट्ट पकडून मोठ्याने ओरडताना दिसत आहे. ज्या महिलेने दुसऱ्या महिलेचे केस पकडले आहेत, तिने संबंधित महिलेने तिच्या आईला अपशब्द वापरल्यामुळे मारहाण सुरू केल्याचे समजते. या भांडणाचे रूपांतर इतके वाढले की अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
भांडणाचे नेमके कारण काय होते?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला दुसऱ्या महिलेला उद्देशून वारंवार म्हणत आहे, “माझ्या आईला तू शिवी का दिली? पोलिसांना बोलवा, तिची माझ्याशी अशा प्रकारे बोलण्याची हिम्मत कशी झाली?” असे म्हणत ती दुसऱ्या महिलेचे केस घट्ट पकडून तिला फरफटत ओढत आहे. दरम्यान, इतर महिला या दोघींचे भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात, परंतु ज्या महिलेने केस पकडले आहेत, ती दुसऱ्या महिलेला सोडायला तयार नाही. ती फक्त पोलिसांना बोलवा, असे ओरडत आहे. इतर महिला तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती इतकी रागात आहे की ती मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही दूर ढकलते. तसेच, ती पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत आहे, “तू माझ्या आईला शिवी कशी देऊ शकतेस?” भर रस्त्यात दोन महिलांची ही जोरदार हाणामारी पाहून बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती आणि प्रत्येकजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र ती महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती.