एप्रिल महिन्यात तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार की 500 रुपये येथे चेक करा

Ladki Bahin Yojana April 2025 Installment Updates राज्यातील महायुती सरकारने मागील वर्षी झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या योजनेवर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीने पुन्हा सत्ता मिळवल्यास ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.

एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यात 1500 जमा होणार की 500

येथे चेक करा

मात्र, हे आश्वासन कधी पूर्ण होईल याबद्दल अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. आता, विरोधकांकडून असा दावा केला जात आहे की, या योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ ५०० रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा परिस्थितीत, ‘लाडकी बहीण योजने’चा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल, याकडे राज्यातील पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे.

एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यात 1500 जमा होणार की 500

येथे चेक करा

काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यांनी नमूद केले होते की, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी निर्णयानुसार, ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे.

एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यात 1500 जमा होणार की 500

येथे चेक करा

तसेच, ज्या महिला इतर सरकारी योजनांमधून १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेत आहेत, त्यांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून दिली जात आहे. याच सरकारी निर्णयानुसार, ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना उर्वरित ५०० रुपये सन्मान निधी वितरित केला जात आहे, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले होते.

‘लाडकी बहीण योजने’चा एप्रिलचा हप्ता कधी मिळेल, याबद्दल अनेक महिला विचारणा करत आहेत. योजनेचे नियम किंवा निकष बदललेले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये कधी मिळतील याची प्रतीक्षा आहे.

अशी चर्चा आहे की, राज्य सरकार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे १५०० रुपये जमा करणार आहे. प्रत्यक्षात या योजनेचा हप्ता कधी मिळतो, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या योजनेतून एकाही पात्र महिलेला वगळण्यात आलेले नाही आणि ३ जुलै २०२४ नंतर या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. ‘लाडकी बहीण योजने’तून केवळ ५०० रुपये मिळणार असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, सरकारचे म्हणणे आहे की, लाभार्थ्यांनी कोणत्यातरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्र सरकारची योजना त्यांना निश्चितपणे मिळेल. केंद्र सरकारच्या योजनेचा आणि राज्य सरकारच्या योजनेचा थेट संबंध नाही, कारण ती योजना पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. जर तसे असेल, तर या ५०० रुपयांच्या योजनेऐवजी १५०० रुपयांचा लाभ घ्यावा. कोणता लाभ निवडायचा हे पूर्णपणे महिलांवर अवलंबून आहे.

दरम्यान, ‘लाडकी बहीण योजने’तील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी ७ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ या काळात वितरित करण्यात आला. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारीचे १५०० रुपये आणि मार्चचे १५०० रुपये असे दोन टप्प्यांत एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया पार पडली.

Leave a Comment