लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्यात एवढ्या महिलांची नावे वगळण्यात आली यादी जाहीर

Ladaki bahin scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार, ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाड्या आहेत आणि ज्या एकापेक्षा जास्त वैयक्तिक योजनांचा लाभ घेत आहेत, अशा महिलांचा शोध घेण्यात आला आहे. आता पुढील टप्प्यात, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार, अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’ वृत्तपत्राला दिली.

वगळण्यात आलेल्या महिलांची यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. निवडणुका जवळ असल्याने, अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची नियमांनुसार व्यवस्थित तपासणी होऊ शकली नाही. दोन महिन्यांत राज्यात दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आणि इतर योजनांसाठी असलेला बराच निधी या योजनेकडे वळवावा लागला. दुसरीकडे, राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असू शकते का, याचा शोध सरकार घेत आहे.

वगळण्यात आलेल्या महिलांची यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम कमी करण्यात आली आहे. आता अंतिम टप्प्यात, योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक करून आयकर विभागाकडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्य स्तरावर घेतला जात आहे, असेही सांगण्यात आले.

वगळण्यात आलेल्या महिलांची यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रत्येक लाभार्थ्याचे आधार लिंकिंग

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, असा नियम आहे. त्यानुसार, आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाकडून त्यासंबंधीची माहिती मागवण्यात आली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे त्या कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

वगळण्यात आलेल्या महिलांची यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

‘लाडक्या बहिणी’ची सध्याची स्थिती

  • एकूण लाभार्थी: २.५३ कोटी
  • अपेक्षित लाभाची रक्कम: ३७,९५० कोटी रुपये
  • बजेटमधील तरतूद: ३४,००० कोटी रुपये

स्थानिक पातळीवर आदेश नाहीत

आयकर रिटर्नमध्ये (ITR) उत्पन्नाची माहिती असते. त्यानुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची राज्य स्तरावरून तपासणी होऊ शकते. स्थानिक पातळीवर त्यासंबंधी कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.

Leave a Comment