एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँकेत जमा होणार की नाही ? योजना बंद

Aditi tatkare ladaki bahin scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील अनेक पात्र महिला करत आहेत. योजनेचे पैसे जमा झाले की नाही, याची खात्री करण्यासाठी महिला बँकांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्याप शासनाकडून आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.

लडकी बहीण योजना एप्रिल महिना हप्ता यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. या योजनेत वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. यासाठी शासनाच्या निर्णयानुसार काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. जुलैपासून आतापर्यंत सहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल हा सातवा हप्ता असून महिनाअखेरीस देखील पैसे न मिळाल्याने याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “एप्रिल महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा केला जाईल.” त्यांनी कोणतीही निश्चित तारीख दिली नसली तरी, महिना संपायला केवळ ९ दिवस शिल्लक असल्याने महिलांना हे पैसे कधी मिळतील याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. काही बातम्यांनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी हा निधी वितरित होण्याची शक्यता आहे. यावर्षी ३० एप्रिलला अक्षय तृतीया असल्याने, आता लाभार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

लडकी बहीण योजना एप्रिल महिना हप्ता यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार का?

या योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेबद्दल विचारले असता, आदिती तटकरे म्हणाल्या, “सुरुवातीपासून या योजनेबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असलेल्या महिलांनाच हा लाभ मिळेल, यात नवीन काही नाही. लाडकी बहीण योजनेच्या सरकारी आदेशात हे स्पष्टपणे नमूद आहे.”

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्या पुढे म्हणाल्या, “ज्या महिला इतर सरकारी योजनांचा, जसे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना त्या योजनेचे १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना नमो शेतकरी योजनेतील १००० रुपये मिळतील आणि उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतील. हेच मूळ सरकारी नियमांमध्येही सांगितले आहे.”

Leave a Comment