Car losses control आपत्कालीन वाहनांना वाट न देणे हा दंडनीय अपराध आहे; तरीही अनेकदा वाहने इतरांना मार्ग देण्यास नकार देतानाची उदाहरणे समोर येत आहेत. नुकतेच याचे उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळाले. एका सेडानने केवळ रुग्णवाहिकेचा मार्गच अडवला नाही, तर स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसून गाडी घसरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
‘ॲम्ब्युलन्स लाईफ’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने डॅशकॅममधील व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक पांढऱ्या रंगाची टोयोटा इटिओस (Toyota Etios) रुग्णवाहिकेच्या पुढे दिसत आहे. जोरदार पाऊस पडत असताना रुग्णवाहिकेचा सायरन वाजतो आहे, तरीही ती सेडान वेगात पुढे जात आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
रुग्णवाहिकेचा चालक सायरन वाजवत राहतो, जेणेकरून सेडानचालक बाजूला होईल; मात्र, तो त्याच लेनमध्ये पुढे जात राहतो. ती सेडान महामार्गावर इतर वाहने, केवळ कारच नव्हे तर दुचाकी आणि ट्रक यांनाही चुकवत वेगाने जात असते. काही मिनिटांनंतर ती ओल्या रस्त्यावर घसरताना दिसते.
चालकाचा काही वेळासाठी गाडीवरील ताबा सुटतो आणि ती सेडान रस्त्यावर फिरून दुभाजकाला धडकते. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत नाही की कारमधील प्रवासी आणि चालक जखमी झाले आहेत की नाही.