पेठ तालुक्यातील १० हजार ७८२ लाभार्थिनींसाठी ९ एप्रिल रोजी साड्यांचा साठा मिळाला आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोचवण्याचे काम सुरु असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे वाटप होईल, असे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, होळी सणासाठी जाहीर केलेली साडी वाटप योजना प्रत्यक्षात महिनाभर उशिराने राबवली जात असल्याने लाडक्या बहिणींना होळीऐवजी अक्षयतृतीयेला ही साड़ी मिळणार आहे.

वणी येथे अंत्योदय योजनेचे ६६९ लाभार्थी आहे. त्यापैकी ६५० साड्या प्राप्त झाल्या आहेत. त्या लाभार्थीना २१ तारखेपासून धान्याबरोबरच वितरित करण्यात येणार आहे.

शासनाने होळी उत्सवाची भेट म्हणून मोफत साडी देणार असल्याचे जाहीर केले होते. आम्ही रेशन दुकानदाराकडे साडी आली का नाही याबाबत चौकशी करण्यासाठी वेळोवेळी चकरा मारल्या. आता महिना झाला तरी, भावाची लाडक्या बहिणीला साडी मिळेना.