https://twitter.com/i/status/1908792192576991282
a drunk pune man viral video मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतातच, पण नशेत असताना लोकांना स्वतःच्या कृत्यांचे भान नसते. अनेकदा दारू पिऊन रस्त्यावर तमाशा करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही वेळा लोक नशेत स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
‘पुणे तिथे काय उणे’ हे उगाच नाही म्हटले जात. पुण्यात कधी काय होईल याचा नेम नसतो. पुणेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात आणि आता पुण्यातील मद्यपी चर्चेत आले आहेत. पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका गर्दीच्या रस्त्याच्या मधोमध एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा मद्यपी भररस्त्यात जे काही करत आहे ते पाहून पुणेकरांना हसू आवरणे कठीण झाले आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत दिसत आहे. इतकेच नव्हे, तर हा माणूस चक्क रस्त्याच्या मधोमध पुश-अप्स मारताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ एका रेडिट वापरकर्त्याने शनिवारी शेअर केला. “अंडा भुर्जीसाठी आलो, फिटनेस मास्टरक्लाससाठी थांबलो,” असे मजेदार कॅप्शन या पोस्टला दिले आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दारूच्या नशेत असलेली व्यक्ती रस्त्याच्या मधोमध पुश-अप्स करत आहे. आजूबाजूने वाहने जात आहेत, ज्यामुळे त्याचा आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याचेही त्याला भान नाही. तो काय करत आहे हे देखील त्याला समजत नाहीये. आसपासचे लोक या मद्यपीची गंमत बघत तिथेच उभे आहेत आणि तो काय करतोय हे पाहत आहेत. रस्त्यावर जास्त वाहने नसल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. दरम्यान, ही घटना रात्री उशिरा घडल्याचे दिसते.