रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला, ओरडत राहिला पण… थरारक VIDEO समोर

 Accident viral video आपण रोज रेल्वे अपघातांच्या अनेक बातम्या ऐकतो आणि यातील बहुतेक अपघात प्रवाशांच्या स्वतःच्या चुकीमुळे घडतात. कधी धावत्या ट्रेनमध्ये चढताना पाय घसरतो, तर कधी दारात उभे असताना तोल जातो. लोकांना वारंवार सूचना देऊनही ते धोकादायक वर्तन सोडत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’ हे अगदी खरं आहे. अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर असताना ट्रेन पकडण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करतात. नुकतीच एक हृदयद्रावक घटना व्हिडिओद्वारे समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकतो आणि त्यानंतर जे घडतं, ते अत्यंत भयानक आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Jahangir Riyasat (@focuskainat)

महाराष्ट्रातील अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत ३४ वर्षीय रोहित बच्छेलाल यादव या व्यक्तीचा जीव गेला. रोहित मूळचा उल्हासनगरच्या लालचौकी भागातील होता आणि काही दिवसांपूर्वीच तो अंबरनाथला राहायला गेला होता. सकाळी ७:५१ च्या सुमारास लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला. तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरित सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांना त्याला वाचवण्यात यश आले नाही.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Jahangir Riyasat (@focuskainat)

अंबरनाथहून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) साठी एक जलद लोकल सुटते. ही लोकल अंबरनाथ यार्डातून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येत असताना, एक प्रवासी धावती गाडी पकडण्यासाठी धावला. मात्र, ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. तो तरुण धावती लोकल पकडताना प्लॅटफॉर्मच्या फटीत पडला आणि दुर्दैवाने लोकलचे दोन ते तीन डबे त्याच्या अंगावरून गेले. यानंतर, रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्पष्टपणे दर्शवते की, धावत्या लोकलमध्ये चढण्याचा धोका किती मोठा असू शकतो. केवळ थोड्या वेळेच्या बचावासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे किती विनाशकारी ठरू शकते, याचे हे एक गंभीर उदाहरण आहे. या घटनेमुळे रोहितच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे अधिकारी या घटनेची चौकशी करत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याच्या विचारात आहेत.

Leave a Comment