Aditi tatkare ladki bahin yojana नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने आता महाराष्ट्रातील पाच लाख महिलांची नावे लाडके बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढलेली आहेत. या संदर्भात आता संपूर्ण न्यूज चैनल वर बातमी फिरत आहेत. तर मित्रांनो या संदर्भात सरकारने काय निर्णय घेतलेला आहे. कोणत्या महिलांचे नाव काढलेला आहे ? या सर्व गोष्टींची माहिती घेऊ.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती. या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षांमधील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार अशा सर्वच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार होता.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
यामध्ये परत कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी हा महाराष्ट्राचा असणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा लाभ तुम्ही वयाची 21 वर्षे चालू झाल्यापासून 65 वर्षे संपेपर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता. तसेच तुमच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
योजनेची उद्दिष्टे
ही योजना सुरू करण्यामागे राज्य शासनाचा अनेक खेतू होते. पहिला येतो म्हणजे महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच रोजगार निर्मितीसाठी मदत होईल अशाप्रकारे काम करणे. महिलांचे समाजातील आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरणार आहे.महिलांना मासिक पंधराशे रुपये दिल्याने महिला ह्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनणार आहेत.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
महिला व माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे
महाराष्ट्र राज्यातील महिला व आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांची मुले यांच्या आरोग्य आणि पोषण या स्थितीत अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा होईल. मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेने परत पुन्हा महायुती सरकार आणले. ह्याच योजनेतील आता महिनाभरात पाच लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. याची महिला व माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया वरून दिलेली आहे.
पाच लाख वगळण्यात आलेल्या महिलांमध्ये मुख्यतः संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी असणारे महिला तसेच 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिला आणि ज्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी आहे अशा महिलांची नावे प्रामुख्याने वगळण्यात आली आहेत.
राज्य सरकारने ज्या महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अशा महिलांकडून पैशांची वसुली होणार नाही. त्यांच्याकडनं परत पैसे घेतले जाणार नाहीत आणि त्यांना जानेवारी महिन्यापासून पुढील कोणताही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असे सांगितले की जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान जेवढी पण लाभाची रक्कम ही महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे ती परत घेतली जाणार नाही.
विधानसभा निवडणूक चालू असताना राज्य सरकारने सांगितले होते की येणाऱ्या काळामध्ये या योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून वाढून ते 2100 रुपये करणार आहेत.परंतु याची अंमलबजावणी आतापर्यंत करण्यात आलेले नाही. येणाऱ्या काळामध्ये राज्यात अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पनामध्ये या वाढीव रकमेची घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
राज्य सरकारने या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही कागदपत्रे ही जाहीर केलेली होती. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड हे लागणार आहे आणि अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच अर्ज करायचा आहे.
दुसरं कागदपत्र म्हणजे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी चे राशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला, पंधरा वर्षांपूर्वीचे जन्म प्रमाणपत्र, अशा कोणत्याही एका कागदपत्राचा वापर करू शकता.
वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असल्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे. हे जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.
जर नव विवाहित असेल, तर तिचे नाव राशन कार्डवर नसणार आहे. त्यामुळे पतीचे रेशन कार्ड म्हणून उत्पन्नाचा दाखला पात्र आहे. तुम्हाला बँक खात्याची तपशील सुद्धा द्यावे लागतील. त्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. महिलेचे हमीपत्र आणि फोटो जोडणे आवश्यक आहे.