लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार

Aditi tatkare Ladki Bahin Yojana Updates राज्यातील लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या योजनेच्या नियमांनुसार, लाभार्थी महिलेला एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे, ज्या महिला ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेत आहेत, त्यांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना ‘नमो शेतकरी योजने’ची रक्कम मिळाल्यानंतर उर्वरित असलेली रक्कमच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्राप्त होणार आहे. केलेल्या छाननीनंतर, राज्यात आठ लाख महिला ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या महिलांना मिळणार 500 रुपये यादी जाहीर

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निर्णय का घेतला?

‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना आता 1500 रुपयांऐवजी या महिन्यापासून केवळ 500 रुपये मिळतील. ‘लाडकी बहीण’ योजनेतील अटीनुसार, एका शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला दुसऱ्या शासकीय योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. ‘नमो शेतकरी योजने’अंतर्गत महिलांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’चे आणखी सहा हजार रुपये त्यांना मिळतात.

या महिलांना मिळणार 500 रुपये यादी जाहीर

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणजेच, या महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाला एकूण बारा हजार रुपये प्राप्त होतात. त्यामुळे, या महिलांना आता उर्वरित सहा हजार रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणार आहेत. याचा अर्थ, ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवळ 500 रुपये मिळतील.

या महिलांना मिळणार 500 रुपये यादी जाहीर

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य शासनाने 2023 मध्ये केंद्राच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘नमो महासन्मान निधी योजना’ सुरू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला तीन समान हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच, दर चार महिन्यांनी केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

‘लाडकी बहीण’ योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, म्हणजेच 30 एप्रिल रोजी जमा होणार आहे. त्यावेळी, ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये मिळतील. ‘लाडकी बहीण’ योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही, जो 30 एप्रिल रोजी वितरित केला जाईल.

Leave a Comment