Anganvadi sevika pension अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ३ मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका-मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत.
सरकारने घेतलेला निर्णय पाहण्यासाठी
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात ५५३ प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत. केंद्राच्या ६० टक्के व राज्याच्या ४० टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते. आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजार रुपयांवरुन १३ हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्याचे मानधन साडेपाच हजारांवरुन साडेसात हजार करण्यात आले आहे. ११ ते २० वर्षे सेवा झालेल्यांना तीन टक्के, २१ ते ३० वर्षे सेवा केलेल्यांना चार टक्के तर ३० वर्षे सेवा झालेल्यांना सेविका-मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढविले आहे. ही मानधनवाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सरकारने घेतलेला निर्णय पाहण्यासाठी
चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते ७५ हजार रुपयेच मिळतात. त्यातून त्यांच्या वृद्धपकाळातील अडचणी सुटणार नसल्यानो निवृत्तीनंतर पेन्शन सुरु करण्याची मागणी आहे. त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का, याकडे सव्वादोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.