अंगणवाडी सेविका भरती : अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

Anganwadi Sevika bharti नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार सध्या विविध सरकारी नोकऱ्यांची भरती काढत आहे. असंच आता महिला व बालविकास विभागाने एक नवीन भरतीची घोषणा केलेली आहे. या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका अशी पदे भरली जाणार आहेत. या पद भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांची 5,639 पदे आणि अंगणवाडी मदतनीस यांची 13243 पदे एवढी काढण्यात आलेले आहेत.

ही पद भरती नसून मेगा भरती आहे. यामध्ये टोटल 18882 पदांची भरती केली जाणार आहे. आता राज्यातील महिलांना या भरतीचा लाभ घेऊन सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना लहान मुलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे राज्य शासनाचा भरती घेऊन योग्य त्या महिलांना नोकरीची संधी देणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी काही शैक्षणिक पात्रता सरकारने जाहीर केलेली आहे. अंगणवाडी सेविका या पदासाठी तुम्हाला कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर जर तुमचे शिक्षण बारावी पास पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पहिले प्राधान्य दिले जाईल. उच्चशिक्षित असणाऱ्यांना जास्त प्राधान्य असेल विशेषतः यामध्ये तुम्हाला पदवीधर डीएड/ बीएड असे जे उमेदवार असतील त्यांना अतिरिक्त गुण मिळू शकतात.
जर तुमच्याकडे MS-CIT चे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल.

  • पहिला कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला तुम्हाला हा रहिवासी दाखला तहसील कार्यालयामार्फत मिळालेला पाहिजे जेणेकरून तुमचे जिल्हा गाव तालुका हे ठिकाण निश्चित होईल.
  • त्यानंतर तुम्हाला बारावी पास असणारे प्रमाणपत्र गुणपत्रक या गोष्टींची गरज लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र गरजेचे आहे.
  • विधवा किंवा अनाथ उमेदवारांसाठी त्या संबंधित लागणारे प्रमाणपत्र आवश्यक

अंगणवाडी भरती ही जिल्ह्यानुसार करण्यात येईल त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची जाहिराती वेगळीच असणार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपल्या जिल्ह्यानुसार अर्ज करावा लागणार आहे काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन फॉर्म स्वीकारले जातील.

निवड प्रक्रिया

मित्रांनो या भरतीमध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार सुद्धा निवड केली जाईल. म्हणजे उच्चशिक्षित असतील त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर अनुभव तुम्हाला जर अंगणवाडी क्षेत्रातील पूर्व अनुभव असेल तर तिथे तुम्हाला प्राधान्य मिळेल. तसेच तुम्ही त्याच गावातील व्यक्ती असाल तर तुम्हाला स्थानिक प्राधान्य सुद्धा दिला जाईल.

या भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही अर्ज हे 14 फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान करू शकतात.

मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात नीट वाचवायची आहे. त्यानंतर जेवढे कागदपत्र जाहिरातीमध्ये सांगितलेले आहे ते तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे लक्षात ठेवून त्या आधीच अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला आवश्यक त्या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करावी लागेल.

महिला व बालविकास विभागाने ही भरती काढून राज्यातील महिलांना एक मोठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी या भरतीचा नक्कीच फायदा घ्यावा. कारण की भरती सरकारी आहे, नोकरी सरकारी असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरीला मिळणारे सर्व फायदे तिथे दिले जातील. जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात

Leave a Comment