ATM कार्ड मिळणार 5 लाख रुपये, असा घ्या फायदा

ATM card benefit of 5 lakhs मित्रांनो आपल्या सर्वांजवळ आता बँक खाते आहे. बँक खाते आले की त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे एटीएम कार्ड ATM Card. एटीएम कार्ड सुद्धा आता प्रत्येक माणसाकडे उपलब्ध झालेले आहे. एटीएम कार्डच्या माध्यमातून आपण अकाउंट मधून कॅश पैसे काढू शकतो. यासाठी आपल्याला बँकेत जायची गरज नाही .

विविध कंपन्यांनी कॅश काढण्यासाठी विविध ठिकाणी बँक एटीएम हे तयार केलेले आहेत. मित्रांनो आता या एटीएम मुळे तुम्ही सरकारच्या योजनांचा फायदा घेऊ शकता आणि या लाभार्थ्यांचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया की ही योजना कोणती आहे आणि या योजनेला कशाप्रकारे अर्ज करायचा कसा लाभ घ्यायचा.

मित्रांनो केंद्र सरकारने चालू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिकांचे बँक खाते ओपन करण्यात आले आहेत.
जास्त बँक खाते ओपन झाल्याने एटीएम कार्डचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुन्या पद्धतीमध्ये तुम्हाला बँकेमधून पैसे काढण्यासाठी फॉर्म भरावा लागायचा आणि तो फॉर्म केशरकडे देऊन तुम्हाला पैसे काढावे लागायचे. यासाठी तुम्हाला लाईन मध्ये उभा राहून वाट बघत बसावी लागायची.
परंतु आता एटीएम आल्याने तुम्ही डायरेक्ट एटीएम का मशीन मध्ये जाऊन एटीएम कार्ड टाकून पिन टाकून तुमच्या कॅश पैसे काढू शकता.

इंश्योरेंस लाभ 

एटीएम कार्ड हे फक्त एटीएम मधून पैसे काढण्यासाठीच नाही, तर याबद्दल एटीएम चे अजून काही महत्त्वाचे उपयोग आहेत जसे की तुम्हाला एक्सीडेंटल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स सुद्धा सुविधा मिळते.जेव्हा बँकेकडून एटीएम कार्ड तुम्हाला दिला जातो तेव्हा हे इन्शुरन्स ऑटोमॅटिक सक्रिय केलं जातं. त्यामुळे एटीएम कार्ड हे आता सुरक्षेसाठी सुद्धा वापरले जात आहे. जर तुम्हाला फ्री इन्शुरन्स लाभ घ्यायचा असेल, तर एटीएम कडे 25 दिवस पूर्ण झालेले पाहिजे मग तुम्ही इन्शुरन्स साठी अर्ज करू शकता.

जर काही अचानक अपघात किंवा अकाल मृत्यू झाल्यास आपण पैसे क्लेम करू शकतो. परंतु विम्याची रक्कम किती असेल हे तुमच्या कार्डवर डिपेंड करेल तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचा आहे यावर तुम्हाला विमा किती दिला जाईल हे ठरवलं जातं.

मित्रांनो खाली काही काळ आणि त्यांचे प्रकार आणि विम्याचे रक्कम देण्यात आलेले आहेत तर आपण पाहूया.

बँकेकडून तुम्हाला क्लासिक सिल्वर गोल्ड प्लॅटिनम अशा विविध प्रकारचे कार्ड दिले जातात. यावरूनच तुमची इन्शुरन्स ची रक्कम ठरवली जाते. मित्रांनो क्लासिक या कार्डवर तुम्हाला एक लाख रुपये मिळेल. तर प्लॅटिनम कार्ड वर दोन लाख रुपये विमा मिळेल. जर सामान्य मास्टर कार्ड असेल तर 50 हजार रुपये मिळेल. मास्टर प्लॅटिनम कार्ड असेल तर तुम्हाला पाच लाखांपर्यंत मिळू शकतो. विजा कार्ड असेल तर तुम्हाला दीड लाख ते दोन लाखांपर्यंत इन्शुरन्स मिळते. रुपये या कार्डवर एक ते दोन लाखांपर्यंत विमा मिळतो.

आपल्याला विमा कोणत्या परिस्थितीत मिळतो तर ते पाहू

मित्रांनो जर एक्सीडेंट झाला आणि एक्सीडेंट मध्ये एक हात किंवा पायामुळे आपण अपंग झालो तर तुम्हाला ५० हजार रुपयांचा इन्शुरन्स मिळतो. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय जर नुकसान झाला असेल, तर एक लाख रुपयांचा विमा मिळतो. आणि मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत विमा दिला जातो.

एटीएम कार्डद्वारे इन्शुरन्स चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एटीएम वर सतत व्यवहार करावे लागत राहतील. त्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन विचारपूस करावे लागेल की याची मर्यादा काय आहे. वेगवेगळ्या बँकेनुसार वेगवेगळे नियम तिथे असू शकतात.

Leave a Comment