Big changes Aadhaar card नमस्कार मित्रांनो असा एकही दिवस जात नसेल की तुम्ही आधार कार्ड या शब्द तुमच्या कारणावर पडत नसेल. आधार कार्ड हे असे कागदपत्र बनले आहे, की माणसातील दैनंदिन जीवनामध्ये पण याचा उपयोग आता केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता आहे.
तुम्ही बाहेर गेलात तर ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग होतो. शाळांमध्ये गेला तिथे आधार कार्ड लागते, बँकिंग वर करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विमा पॉलिसी गुंतवणूक अशा विविध ठिकाणी तुम्ही कोण आहात हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा वापर करावाच लागतो.
How to change address on Aadhar card आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलायचा
मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काही गरजेनुसार आधार कार्ड मध्ये बदल करावा लागतो. मोबाईल नंबर बदलणे घराचा पत्ता बदलणे अशा विविध गोष्टी बदलावे लागतात कधी कधी जन्मतारीख चुकलेले असते. तर मित्रांनो आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलायचा ही गोष्ट समजून घेणार आहोत.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI याद्वारे आधार कार्ड हे चालवले जाते. आधार कार्ड मेंटेन केले जाते आधार कार्ड चे नियम बनवले जातात.UIDAI ने आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी कोणतेही मर्यादा घालून दिलेली नाही. तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळेस आधार कार्डवर पत्ता बदलू शकता.
काही कारणास्तव आपल्या घराचा पत्ता बदलतो जसे की नोकरीची जागा बदलणे. जागा बदलल्यानंतर पत्ता बदलायची आवश्यकता भासते. तर आज आपण भाऊ पत्ता बदलण्यासाठी काय काय प्रक्रिया आहे ते.
Offline Method ऑफलाईन पद्धत
आधार काढून पत्ता बदलण्यासाठी दोन पद्धतीने पत्ता बदलता येतो पहिली पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत या पद्धतीमध्ये तुम्हाला जवळील आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल तिथे गेल्यानंतर आवश्यक कागदपत्र द्यावे लागतील अर्ज भरावा लागेल. बायोमेट्रिक तुम्हाला द्यावे लागेल तुमच्या हातांचे बोटांचे ठसे घेतले जातील. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
Online Method ऑनलाईन पद्धत
दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत या पद्धतीमध्ये तुम्हाला युआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला आधार पत्ता अपडेट करा या विभागात जावे लागेल. आवश्यक ती माहिती भरावी लागेल पत्ता वेळेस पत्त्याची पुरावे तुम्हाला तिथे द्यावे लागतील. तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
List of required documents आवश्यक कागदपत्रांची यादी
आता मित्रांनो घराचा पत्ता बदलण्यासाठी काही आवश्यक पत्र लागत असतात. तर त्या पत्रा आवश्यक कागदपत्रांची यादी कोणती आपण ते पाहू
- वीज बिल असेल तर ते तुम्ही वापरू शकता वीज बिल तुमच्याकडे तीन महिन्यापेक्षा जुने असावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही पाणी बिल सुद्धा वापरू शकता.
- त्यानंतर टेलिफोन बिल लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाईल असेल तर तुमच्या घरी पत्राद्वारे जे बिल येतात ते बिल सुद्धा तुम्ही वापरू शकता.
- त्यानंतर बँक पासबुक किंवा स्टेटमेंट पासपोर्ट तुम्ही वापरू शकता.
- मतदार कार्ड सुद्धा तुम्ही वापरू शकता.
- गॅस कनेक्शन बिल
- घराचे भाडे करार पत्र
- प्रॉपर्टी टॅक्स बिल आणि वाहन विमा पॉलिसी
अशा विविध कागदांचा तुम्ही वापर करून पत्ता बदलू शकता.
मित्रांनो जेव्हा तुम्ही पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रात येतात त्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते म्हणजे सर्व कागदपत्रांवर तुमचंच नाव पाहिजे त्यानंतर कागदपत्र हे स्पष्ट आणि वाचता यावीत अशी असावी. त्यानंतर स्कॅन केलेले कागदपत्रे ही चांगल्या रीजर्वेशन मध्ये तुम्हाला द्यावे लागेल. जेणेकरून केल्यानंतर तुमची प्रत्येक गोष्ट स्पष्ट प्रमाणात दिसेल.
अर्ज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला जो क्रमांक दिला जाईल त्याला जपून ठेवा तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे की नाही याची खात्री करून घ्या.
काही दिवसांनी तुम्हाला पोस्टाने नवीन आधार कार्ड तुमच्या घरी येईल आणि त्यानंतर तुम्ही महत्त्वाच्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या नवीन पत्ता अपडेट करू शकता.
मित्रांनो यासाठी तुम्हाला पैसे काही आकारले जातात ऑफलाइन पद्धतीने जर तुम्ही पत्ता बदलणार असेल तर तुम्हाला पन्नास रुपये आकारल्या जातात त्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केला तर तुम्हाला 25 रुपये एवढे पैसे आकारले जातात पत्ता बदलण्याची प्रक्रिया संपूर्णतः साधारणपणे 10 ते 15 दिवसांमध्ये पूर्ण होते.