Bride viral dance भारतातील लग्न म्हटलं की नाचगाणी आणि उत्साहाला उधाण येतो. मिरवणूक असो किंवा वधू-वरांचे एकत्र येणे, लोकं आनंदाने थिरकतात. पूर्वी लग्नाच्या दिवशी वधू घरातून डोकावून मिरवणूक बघायची, पण आता चित्र बदलले आहे. केवळ वराचे मित्रच नव्हे, तर वधूच्या मैत्रिणीसुद्धा लग्नात मनसोक्त नाचतात. वराची मिरवणूक दारात पोहोचल्यावर सर्वांचा उत्साह ओसंडून वाहतो. विशेष म्हणजे, आजकाल नववधू देखील स्वतःच्या लग्नात जोरदार डान्स करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक खास व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न हा एक अविस्मरणीय क्षण असतो. केवळ नवरा-नवरीच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येकाला हा दिवस कायम लक्षात राहावा असे वाटते. त्यामुळेच, आजकाल नववधू आणि वर लग्नात काहीतरी खास करून सगळ्यांना सुखद धक्का देतात. आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आनंददायी करण्यासाठी अनेक जोडपी लग्नाच्या दिवशी डान्स करतात. सध्या एका नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजतो आहे. या व्हिडिओमध्ये नवरीने आपल्या नवऱ्यासाठी अप्रतिम नृत्य सादर केले आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
नवरीने लोकप्रिय मराठी गाणे “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” यावर ताल धरला आहे. व्हिडिओमध्ये नवरदेव स्टेजवर उभा असून तो आपल्या पत्नीचा डान्स पाहून लाजतो आणि आनंदित होतो. नववधूंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. सहसा, नवीन नवरी थोडी लाजणारी आणि घरात रुळायला वेळ घेणारी असते, असा अनुभव असतो. पण या व्हायरल व्हिडिओतील नवरीचा डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या नृत्याने सासरच्या मंडळींनाही खूप आनंदित केले आहे.
प्रत्येक मुला-मुलीचे आपल्या भावी जोडीदाराबद्दल काही स्वप्न असतात. सुंदर, सुशील आणि उत्तम गृहिणी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एका अशाच नवरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जिला पाहून तुम्हालाही वाटेल, ‘मला सुद्धा अशीच नवरी हवी!’