सुसाट धावणाऱ्या बाईकवर उभे राहून मद्यधुंद तरुणीचा भलताच थिल्लरपणा, व्हिडिओ झाला तुफान वायरल

Drunk girl viral video रस्त्यांवर कोणतेही वाहन चालवताना धोकादायक स्टंट करून नको ते धाडस करण्याचा ट्रेंड तरुणाईमध्ये वाढला आहे. परंतु त्याचे गंभीर परिणाम अनेकदा इतरांना भोगावे लागतात. भोपाळच्या व्हीआयपी रोडवरील एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद तरुणी आणि दोन तरुणांसह भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीवर उभी राहून धोकादायक स्टंट करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन पुरूषांना अटक करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक दुचाकी भरधाव वेगाने रसत्यावरून धावत आहे. दुचाकीवर दोन तरुण आहे आणि त्यांच्यामध्ये एक तरुणी उभी आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मागे बसलेल्या तरुणाने तरुणीला पकडले आहे. तरुणी मद्यधुंद अवस्थेतच व्हिडिओ शूट करणाऱ्यांना अश्लील हातवारे करते. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून व्हिडओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मनीष लालवाणी यांनी कोह-ए-फिजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. दोन पुरूष बेपर्वाईने बाईक चालवत होते. तसेच त्या दोन पुरूषांच्यामध्ये दुचाकीवर एक महिला उभी राहून “अश्लील हावभाव” करत होती, ज्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

.

 

Leave a Comment