शेतकऱ्यांना मिळणार मोफत फवारणी पंप, पहा अर्ज प्रक्रिया

Farmers free spray pumps महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सध्या विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये शेती उपयोगी वस्तू मिळाव्यात यासाठी विविध योजना तयार करण्यात आलेला आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत फवारणी पंप.

मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीत काम करत असताना प्रत्येक पिकावर फवारणी करावीच लागते आणि फवारणी करताना सर्वात मोठे यंत्र जे कामात येतं ते म्हणजे फवारणी पंप. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला याची गरजच असते. यामुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
राज्य सरकारने महाडीबीटीच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यामुळे आता योजनांमध्ये भ्रष्टाचार होत नाही. शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या योजना पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.

राज्य शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन वेबसाईट चालू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून विविध योजना तयार केल्या जातात. ऑनलाइन माध्यमातून सुविधा तयार केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा लवकर मिळत आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्याला जायची गरज नाही. ऑनलाईन घरबसल्या फॉर्म भरा आणि मेसेज आल्यानंतर पुढची प्रोसेस करा.

परंतु अलीकडच्या काळामध्ये या सरकारी योजनांना थोडे आव्हान निर्माण झालेले दिसत आहे. यामध्ये लॉटरीचे निकाल लवकर न लागणे अर्ज केलेले लवकर मंजूर न होणे लवकर अनुदान न मिळणे या गोष्टी सध्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. महाडीबीटी च्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असताना आता यांमध्ये उशीर केला जात आहे. शेतकऱ्यांनी विहिरीसाठी केलेले अर्ज आता लवकर मंजूर होत नाहीत. यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

मित्रांनो या सर्व योजनांपैकीच एक योजना म्हणजे सौरचलित फवारणी पंप ही योजना सध्या खूप लोकप्रिय झालेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे. नोंदणी केल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे कळवल्या जाते. त्यानंतर लाभार्थी यादी तुमचे नाव दिसेल यादीत नाव आल्यानंतर तुम्हाला पाहिजे ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

या महाडीबीटी पोर्टलवर अजून वेगळ्या योजना म्हणजे एकात्मता एकात्मिक फलोत्पादन, बियाणे अर्ज योजना, सिंचन योजना, तुषार योजना त्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाईपलाईनची योजना ट्रॅक्टर योजना अशा विविध योजनांची अर्ज सुरू असतात. महाडीबीटी पोर्टल वर तुम्हाला सातबारा आणि आधार कार्ड च्याद्वारे लॉगिन करावे लागेल. तिथे अकाउंट तयार करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही विविध योजनांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर सरकार जेव्हा त्याची लॉटरी काढेल त्यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला एसएमएस द्वारे कळवले जाईल.

महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची निवड झाली का नाही. हे पाहण्यासाठी तिथे असलेल्या मी अर्ज केलेला बाबी या बटनावर क्लिक करा त्यानंतर मंजूर झालेल्या बाबी या विभागात जावे लागेल त्यानंतर मंजूर झालेला अर्ज तुम्हाला तिथे दिसेल. जर तुमचा अर्ज छाननी प्रक्रिया अंतर्गत असेल तर तिथे छाननी अंतर्गत असं ऑप्शन तुम्हाला दिसेल.

मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला सर्व माहिती बरोबर भरावी लागेल आवश्यक कागदपत्रे ती वेबसाईटवर अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा चालू असलेलाच द्या जेणेकरून तुम्हाला एसएमएस लवकर मिळतील आणि एक शेतकरी एक आधार कार्डवर एकच अकाउंट तयार करू शकतो. पण तुम्ही एका अकाऊंट मधून विविध योजनांसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही एखाद्या योजनेसाठी अर्ज केला जसे की ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज केला आणि एकदा तुम्हाला ट्रॅक्टर मिळाल्यानंतर तुम्ही परत त्याच योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत तुम्ही इतर योजनांचा नंतर लाभ घेऊ शकता.

Leave a Comment