घर बांधणाऱ्यांना खूशखबर, मिळणार 5 ब्रास मोफत वाळू

free sand  राज्यातील घरकुल बांधणाऱ्या लाखो नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, त्यामुळे घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लाभार्थ्यांची यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

महसूलमंत्र्यांनी दिलेली माहिती:

  • ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे, त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव करण्यात येतील.
  • घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे.
  • मागणीनुसार वाळूचा पुरवठा करण्यासाठी नवीन वाळू धोरण तयार करण्यात येत आहे.
  • दगड खाणींमधून वाळू तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • त्यामुळे दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होऊन नदीतील वाळूची मागणी कमी होईल.
  • येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होईल.

लाभार्थ्यांची यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या निर्णयाचे फायदे:

  • घरकुल बांधणीचा खर्च कमी होईल.
  • अनेक कुटुंबांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल.
  • नदीतील वाळूचे उत्खनन कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल.

लाभार्थ्यांची यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अतिरिक्त माहिती:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे.
  • मोफत वाळूसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
  • वाळूची बुकिंग केल्यानंतरच अर्जदाराला मोफत वाळू मिळेल.
  • फक्त 5 ब्रास पर्यंत वाळू मोफत दिली जाईल.
  • उमेदवार गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील असावा.
  • ज्यांना घरकुल मिळाले आहे, फक्त अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment