Free st pravas नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे नेहमीच प्रवाशांच्या फायद्यासाठी विविध योजना चालू करत असतं. महाराष्ट्र राज्याचे एसटी ही प्रत्येक गावोगावी खेडोपाडी सर्व शहरांमध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे प्रवास करण्याचा मार्ग सुखद झालेला आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आता ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये तुम्ही फोन पे गुगल पे यूपीएच्या माध्यमातून पैसे देऊ शकता. यामुळे सर्व मोठा प्रॉब्लेम सॉल्व होईल तो म्हणजे सुट्टे पैशांचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला खिशात पैसे घेऊन जायची गरज राहणार नाही. एस टी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच तिकीटामध्ये दरवाढ केलेली आहे ही दरवाढ 14.95% एवढी केली.
दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसलेला आहे. यावर्षी भाडेवाढ करतानाही थोडी वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. जेव्हा 2018 मध्ये भाडेवाढ झाली होती तेव्हा ही पाच रुपयांच्या पटीत तिखटाचे नवीन दर ठरवण्यात आले होते. परंतु आता 11-16 23 28 27 अशा प्रकारे पैशांची वाढ झालेली आहे त्यामुळे सुट्टे पैशांची समस्या तयार झाली.
लोकांकडे सुट्टी पैसे नसतात आणि कंडक्टर कडेही नसतात. यामुळे कधी कधी प्रवास करताना वाद निर्माण होतो. एस टी महामंडळाने ही सुविधा 11 डिसेंबर पासून चालू केली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बस मध्ये QR कोड हे लावले जातील. आणि प्रवासी हे त्यांच्या मोबाईल वरून फोन पे गुगल पे उपयोग द्वारे पेमेंट करू शकतील.
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी इतर काही सवलती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत . यामधील सर्वात मोठी सुविधा म्हणजे महिलांना 50% मोफत प्रवास. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 75 वर वर्ष अपेक्षा वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास.
मित्रांनो एसटी महामंडळाने काही विशेष लोकांसाठी 100% भाडे सवलती मध्ये सूट दिलेली आहे. तर कोणाकोणाला आहे आपण हे पाहूया.
- स्वातंत्र्य सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास मिळेल. यासाठी तुम्ही साधी, निम आराम, आराम बसचा वापर करू शकतात.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास करता येणार. यासाठी तुम्ही साधी, निम आराम, आराम बस वापरू शकता.
- अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण साधी बस मधून शंभर टक्के सवलतीने प्रवास करू शकता.
- राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना 50% सवलत देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही साधी, निम आराम, आराम या बसचा वापर करू शकता.
- तसेच महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100% सूट देण्यात आलेली आहे
- अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्याचे एक साथीदार यांना साधी व निम आराम बस मधून शंभर टक्के सूट देण्यात आलेली आहे.
- डायलिसिस रुग्णांसाठी सुद्धा 100% मोफत प्रवास देण्यात आलेला आहे. त्यानंतर हिमोफेलिया या रुग्णांसाठी सुद्धा शंभर टक्के मोफत प्रवास देण्यात आलेला आहे.
- जर विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे पाठवायचे असेल, तर तुम्ही शंभर टक्के मोफत ते बसद्वारे पाठवू शकतात. त्यासाठी तुम्हाला साधी बसचा वापर करावा लागेल.
- आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास मिळेल. यासाठी तुम्ही साधी आणि निम आराम, आराम बस वापरू शकता.
- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास मिळेल. यामध्ये तुम्ही साधी, निम आराम, आराम बस वापरू शकता.