Get free kitchen kits मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक घराच्या बांधकामासाठी कामगार लागत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कोणतेही शहरांमध्ये विकास, गावांमध्ये विकास घडवायचा असेल तर तिथे बांधकामे केले जाते आणि अशाच बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असत. महाराष्ट्र राज्याचा विकास हा बांधकाम क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांकडूनच राज्यामध्ये विकसित शहरे, विकसित गावे निर्माण होत आहेत. परंतु या कामगारांचे स्वतःचे जीवनच खूप हालाखीचे असते. आणि त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्या राहणीमानामध्ये आणि दैनंदिन जीवनात सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवते. या योजनांचे अंमलबजावणी बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे राबवत असतं.
अशाच योजनांमधील एक योजना म्हणजे भांडी सेट देणे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाक घरात लागणारी वस्तू भांडे या सर्व गोष्टींचा सेट दिला जातो. मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की आत्ताच विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि नियमानुसार प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व सरकारी योजनांना स्थगिती दिली जाते. त्याचप्रमाणे या योजनेला सुद्धा स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे.आता या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी आपली नोंदणी केलेली आहे, अशा सर्व कामगारांना भांडी सेट हा देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळाल्याने कामगारांना खूप मोठा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने अजूनही कामगार बांधवांसाठी एक योजना राबवली जाते ती म्हणजे विवाह सहाय्य योजना. कामगार बंधूंन समोर आपल्या मुला मुलीचे लग्न करण्यासाठी लागणारा पैसा मिळवणे हा एक खूप मोठे संकट असते. या संकटावर मात करण्यासाठी आता राज्य सरकारतर्फे मुलांच्या आणि मुलींचे विवाह साठी त्यांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे कामगार बंधूंना आपल्या मुला मुलीचे विवाह करण्यासाठी मदत होईल.
एका वयानंतर कामगार बंधूंना काम करता येत नाही. त्यासाठी राज्य सरकारने त्यांना निवृत्ती योजना चालू केलेली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला निवृत्तीच्या काळात दर महिन्याला पेन्शन मिळते. जर कामगारांना काम करताना अपघाती मृत्यू आल्यास राज्य शासनातर्फे जीवन विमा आणि सुरक्षा अशा विविध योजनांद्वारे त्यांना संरक्षण दिले जाते.
कामगार बंधूंच्या मुलांना मुलींना शैक्षणिक क्षेत्रात मदत व्हावी म्हणून राज्य शासनातर्फे त्यांना आर्थिक मदत केली जाते. शिक्षण घेताना त्यांना कोणती अडचणी येऊ नये म्हणून शालेय योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना अडीच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत केली जाते. राज्य सरकारने केलेल्या या मदतीमुळे त्यांना पुस्तके विकत घेणे, गणवेश विकत घेणे, शालेय साहित्य खरेदी करणे, अशा गोष्टींसाठी पैसा मिळतो आणि शैक्षणिक खर्च कमी होतो.
राज्य शासनाने महिला कामगारांच्या आरोग्याबाबतही काही योजना आखलेले आहेत. या योजनेअंतर्गत जर नैसर्गिक प्रस्तुतीसाठी 15000 रुपये तर शस्त्रक्रिया द्वारे होणाऱ्या परिस्थितीसाठी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर कामगारांना काही गंभीर आजार झाल्यास त्यांना एक लाख रुपयांपर्यंत सरकारतर्फे मदत दिली जाते तसेच अपघाती निधन झाल्यास दोन लाख रुपयांचा विमा सुद्धा तुम्हाला दिला जातो.
या सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार महामंडळाकडे तुम्हाला नोंदणी करावी लागेल. सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट द्वारे नोंदणी करू शकता. या नोंदणी प्रक्रियेसाठी खालील वेबसाईट दिलेली आहे. mahabocw.in
कामगार बांधवांसाठी या सर्व योजना राबवल्या जातात. त्यामुळे आता कामगार बांधवांमध्ये जागरूकता येऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांनी या योजनेचा फायदा घेतल्या त्यांचे जीवनमान सुधारेल त्यांना आर्थिक मदत होईल. कामगार बांधवांच्या मुला मुलींचे शिक्षण होण्यास मदत होईल. त्यामुळे कामगार बांधवांनी जास्तीत जास्त पुढे येऊन या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे