Gold price drops भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला तर माहीतच आहे की सोन्याला खूप सारे महत्त्व आहे सोनं हा लोकांच्या जगण्यातील प्रतिष्ठेचा आणि संस्कृतीचा घटक आहे.सोन्याकडे फक्त शोभाई चे दागिने म्हणून पाहिले जात नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आणि अडचणींमध्ये आर्थिक मदत म्हणून सुद्धा पाहिले जाते. 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. सामान्यांसाठी सोने खरेदी करण्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
जर आपण सध्याची बाजार स्थिती पाहिली तर 9 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत ही दहा ग्रॅम दहा ग्राम साठी 84 हजार 699 रुपये एवढी होती. आणि ही आतापर्यंतची सर्वात जास्त किंमत मानली जाते. आणि 22 कॅरेट सोन्यासाठी किंमत ही 77 हजार 585 एवढी होती. सोन्याचे दर वाढल्यामुळे चांदीच्या किमतीतील मोठी वाढ झालेली आहे. चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ही 95 हजार 391 रुपयांवर पोहोचली आहे. ही झालेली वाढ फक्त स्थानिक बाजार मध्येच मर्यादित नसून आता जागतिक बाजारपेठेवर याचा परिणाम होत आहे.
आजचे सोन्याचे भाव
Date : 10/02/25
22 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 7980 |
8 | 63,840 |
10 | 79,800 |
100 | 7,98,000 |
24 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 8706 |
8 | 69,648 |
10 | 87,060 |
100 | 8,70,600 |
* वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
सोन्याच्या किमतीत सुद्धा शहरानुसार फरक पडत असतो. दिल्ली आणि जयपुर या शहरांमध्ये सोन्याला सर्वाधिक भाव आहे. दिल्लीमधील भाव हा 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 77 हजार 190 रुपये आहे. तसं पाहिलं तर मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई या मोठ्या शहरांमध्ये थोडे भाव कमी आहेत इथे सोन्याच्या 22 कॅरेट चा भाव हा 77 हजार 40 रुपये एवढा आहे. हा जो शहरानुसार बदल येतो तो काही गोष्टींवर अवलंबून असतो जसे की मागणी वाहतूक खर्च आणि संरचनांमधील फरक.
वाढण्याची कारणे: सोन्याच्या किमतीतील ही वाढ अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे:
- जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठे चढ उतार येत असल्याने गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत आहेत.
- 2024 मध्ये जागतिक बँकांनी 104.6 टन सोने खरेदी केले आहे आणि हा आकडा सर्वात जास्त आहे.
- सध्या जगामध्ये सोन्याची मागणी अधिक वाढत आहे.
- जगामध्ये असणारे राजकीय वातावरण भू राजकारण राजकीय अस्थिरता यांमुळे सोन्याच्या भावांमध्ये वाढ होत आहे.
शुद्धतेचे महत्त्व:
आपण सोन्याच्या शुद्धतेबद्दल बोलू मित्रांना 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते तर 22 कॅरेट सोने 91.6% शुद्ध असते सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्याची शुद्धता पाहणे आवश्यक आहे त्यानंतर हॉलमार्क असणे सुद्धा आवश्यक आहे हॉलमार्क नसलेले सोने कधीही खरेदी करू नका.
तज्ञांच्या मते, भविष्यात खालील घटक महत्त्वाची भूमिका बजावतील:
- जागतिक आर्थिक धोरणे
- चलनवाढीचा दर
- आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध
- भू-राजकीय परिस्थिती
गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे: सध्याच्या परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी खालील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे:
- दीर्घकालीन दृष्टिकोन घ्या
- टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा
- फक्त विश्वसनीय स्त्रोतांकडूनच खरेदी करा
- बाजारातील चढउतारांवर लक्ष ठेवा
- विविधीकरणाचे महत्त्व लक्षात ठेवा
मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवणे जोगे आहे ती म्हणजे सोन्याचे किमतींमध्ये हळूहळू वाढ होत जाते आणि याचे दीर्घकालीन परिणाम असतात. गुंतवणूकदारांनी सोन्याच मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता थोडा वेळ देऊन निर्णय घ्यावा. सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी नेहमी सुरक्षित आणि लाभदायक राहील.
परंतु सोने खरेदी करताना तुम्हाला योग्य ती वेळ किंमत आणि दर्जा या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या काळामध्ये आणि जगभरामध्ये सोने ही अशी एक वस्तू आहे जिच्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. त्यासाठी संपूर्ण अभ्यास करून आणि नियोजन करूनच सोन्यामध्ये गुंतवणूक करा.