Heart attack video सध्या भारतासह जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणा वाढतेय. पूर्वी केवळ वृद्धांपर्यंत सीमित असलेला हा आजार हल्ली शाळकरी मुलांपासून ते तरुणांमध्येही झपाट्याने वाढतोय; ज्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागतोय. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून मित्रांसह हसत खेळत गप्पा मारत होता. मात्र, त्याचदरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हसतं खेळतं वातावरण अचानक दु:खात बदललं. दुकानदाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात गाठले मृत्यूने
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्याशिवाय एका लहान शाळकरी मुलीलाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावावा लागला. या घटनेनंतर आता अशाच प्रकारे एका दुकानदारालाही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात मृत्यूने गाठले.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक दुकानदार त्याच्या दुकानात काही मित्रांबरोबर आरामात गप्पा मारत बसला आहे. मित्रांसह तो हसत खेळत गप्पा मारतोय. मात्र, बोलता बोलता तो दुकानाच्या काउंटरवर कोसळला. काही वेळ मित्रांनाही समजले नाही की, तो नक्की असे का करतोय. पण, त्याने जेव्हा मान टाकली तेव्हा सर्वांनी त्याला पकडले. त्यानंतर काहींनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एका मित्राने हृदयावर दाब देऊन, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काही उठला नाही. यावेळी मित्रांनी धाव त्याला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हसते खेळते वातावरण अचानक दु:खात बदलले.