पण महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र दाखवलं आहे. दुचाकीसाठी जे रेट आले आहेत ते ४२० ते ४८० पर्यंत आहेत ते महाराष्ट्रात ४५० आहेत. तीन चाकीसाठी ४५० ते ५५० आहेत, महाराष्ट्रात ५०० आहे. चार चाकीसाठी ८०० रूपये आहेत आपल्याकडे ७४५ आहेत. जड वाहनांसाठी ६९० ते ८०० आहेत तर आपल्याकडे ७४५ असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. गोव्याचा विचार केला तर पाहिलं तर मूळ किंमत ३१५ रूपये, फिटमेंट फी १०० रूपये, सुविधा शुल्क ५० रूपये, जीएसटी ८३ रूपये अशी त्यांची एकूण ५४८ रूपये होते. चंदीगढचीही ५४९ रूपये होतेय पण महाराष्ट्राची एकूण किंमत ५३१ रूपये होतेय.