kharif 2024 crop insurance पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२४ मधील नुकसानभरपाई देण्यासाठी २१९७.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा वाटा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच पीक विम्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानमंडळात दिली.
खरीप 2024 नुकसान भरपाई गावानुसार जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोकाटे म्हणाले की, “राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी पीक विम्याचे वाटप केले जाईल. राज्य सरकार विमा हप्ता कंपन्यांना देण्याचे काम करत आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने निधी मंजूर करण्यासाठी वित्त विभागाला थोडा वेळ लागेल, परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपूर्वी खरीप २०२४ ची विम्याची भरपाई जमा होईल, याची ग्वाही कृषीमंत्री कोकाटे यांनी दिली आहे.
खरीप 2024 नुकसान भरपाई गावानुसार जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. पाटील म्हणाले, “खरीप पीक विमा ऑगस्टमध्ये जमा होणे अपेक्षित होते, पण राज्य सरकारने कंपन्यांना वेळेवर वाटा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा वेळेवर मिळाला नाही.”
तसेच, पीक विमा कंपन्या मंजूर पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करत नाहीत. बँकांकडून व्याज घेतात, परंतु शेतकऱ्यांना विमा रक्कम देत नाहीत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्ष वेधले.