kharif 2024 crop insurance list

खरीप हंगाम २०२४ चा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्यामुळे विधानमंडळात शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधी मांडली, त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते.

दरम्यान, राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कंपन्यांना दिली आणि काही भागात पंचनामेही झाले, परंतु शेतकऱ्यांना अद्याप खरीप २०२४ चा पीक विमा मिळालेला नाही. शेतकरी नेते राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत आहेत.