या तारखेपासून 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार

ladaki bahin yojana राज्यातील ज्या कुटुंबांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली. या योजनेची अंमलबजावणी मागील वर्षी जुलै महिन्यात सुरु झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘लाडकी बहीण योजना’ हा महत्त्वाचा मुद्दा होता. विरोधी पक्षांनी या योजनेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तर महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे, पण २१०० रुपयांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पात्र महिलांना दरमहा २१०० रुपये कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत २१०० रुपयांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यावरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

“दीड हजार रुपयांऐवजी महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, ते कधी मिळणार? अधिवेशनात याची घोषणा होणार आहे की नाही? यावर स्पष्ट उत्तर हवे,” असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण योजने’बाबत महत्त्वाची माहिती दिली.

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देणारे हे एकमेव सरकार आहे. त्यामुळे महिलांच्या जीवनात आनंद आहे, तो कायम राहील. २१०० रुपयांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

Leave a Comment