लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ladaki bahin yojana 2025 महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी सरकारी योजना म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’. ही योजना मागील वर्षी जून महिन्यात सुरू झाली असून, आता तिला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेअंतर्गत, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात.

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सत्ता आल्यास लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असले तरी, अद्याप 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दुसरीकडे, या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधक असा आरोप करत आहेत की सरकार लवकरच ही योजना बंद करणार आहे, तसेच इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात आहे. त्यामुळे सध्या ही योजना चांगलीच चर्चेत आहे.

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेबद्दल बोलताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी येथे महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, “अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक विनाकारण चर्चा करत असतात, की सरकार आता या योजनेचे पैसे थांबवणार, त्यांची गरज संपली आहे. ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा प्रकारची चर्चा ते करत असतात. मात्र, मी असे करणार नाही. राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही आणि संपूर्ण महायुतीचीसुद्धा तीच भूमिका आहे. मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांचीही तीच भूमिका आहे. आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे. त्यामुळे ही योजना निश्चितपणे सुरू राहील. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. जर एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

Leave a Comment