Ladki bahin february installment नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ज्या योजनेचा लाभ सामान्य लोकांनी घेतला आणि विशेषतः महिलांनी घेतला अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना जशी सुरू झाली आहे त्या दिवसापासूनच तिच्याबद्दल खूप मोठ्या चर्चा होत आहेत.
योजनेचे पैसे 1500 वरून 2100 कधी ?
या योजनेबद्दल राज्य सरकारकडून पण मोठ मोठ्या घोषणा केल्या गेल्या. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये क्रेडिट केले जातात. विधानसभा इलेक्शनच्या प्रचारादरम्यान राज्य सरकारने सांगितले होते की आम्ही हे रक्कम वाढवून 2100 रुपये करू आणि त्यापुढेही जाऊन सांगितले होते की असंच चालू राहिल्यास आम्ही ही रक्कम 3000 पर्यंत करू.
मित्रांनो आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे 1500 रुपयावरून 2100 रुपये कधी होतात याची आता वाट पाहावी लागत आहे. सध्या 2100 रुपये वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. आणि त्यामध्ये आता नवीन गोष्ट अशी म्हणजे लाभार्थी असलेल्या सर्व महिलांचे आता पुन्हा एकदा पडताळणी सुरू केलेली आहे.
Ladki bahin rejected list या महिलांची नावे वगळणार
पडताळणी सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. योजनेच्या नियमाप्रमाणे जर महिलांच्या घरी चार चाकी वाहन असेल, तर अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे आधीच सांगितलेले होते. परंतु तरीही काही महिलांनी अर्ज भरलेले आहेत. आता अशा सर्व महिलांची पडताळणी सुरू केलेली आहे. पडताळणी करून आता लाडक्या बहिणींची नावे पात्रता यादी मधून वगळण्याची सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो आता जी पडताळणी सुरू झालेले यामध्ये मुख्यतः चार चाकी वाहन असणं त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी असणं त्यानंतर नमो शक्ती या योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महिलांची नावे आता वगळण्यात येत आहेत.
पात्रता आणि सरकारी खर्च
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर महिला ह्या लाभार्थी आहेत याची संख्या दोन कोटी 59 लाख एवढी आहे. एवढ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे म्हणजे सरकारी खात्यातील 385 कोटी रुपये हे द्यावे लागतात. या योजनेच्या नियमानुसार अशाच महिलांना लाभ घेता येईल. ज्या महिलांकडे चार चाकी नाही, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहेत तसेच त्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशाच सर्व महिलांना लाभ मिळणार होता. परंतु आता असं झालं आहे की काही महिलांना इतर योजनांचा पण लाभ मिळतो आणि माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळतो आता, अशाही महिलांची पडताळणी होणार आहे.
Ladki bahin february installment date फेब्रुवारी हप्ता खात्यात कधी जमा होणार
राज्य सरकारने ही कारवाई सुरू केल्यापासून पाच लाख 40 हजार एवढे अपात्र महिलांची नावे समोर आलेली आहेत. आता ही पडताळणी किती दिवस चालेल याचा काही राज्य सरकार तर्फे सांगण्यात आलेलं नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल या संदर्भातही काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महिलांची पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांकडे याद्या दिलेल्या आहेत. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये याचा अहवाल शासनाला त्यांना सादर करायचा आहे. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच फेब्रुवारी महिन्याचे पैसे पडतील अशी शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर पडत असलेल्या तानामुळे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ सध्या थांबवला गेला आहे.
ज्या महिलांची नावे या योजनेमध्ये बसत नाहीत किंवा अपात्र आहेत अशा सर्वच महिलांची पडताळणी होईल त्यामुळे जोपर्यंत पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत फेब्रुवारी चे पैसे खात्यामध्ये जमा होतील की नाही यासंदर्भात आता अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
लाडकी बहीण योजनेचा आता इतर योजना नाही फटका बसत आहे. महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाच्या सन 2024-25 च्या अंदाजपत्रकानुसार आता राज्यातील सर्व विविध विभागांना त्यांच्या खर्च करण्याच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. आणि एकूण तरतुदीच्या फक्त 70 टक्केच रक्कम तुम्ही खर्च करू शकतात अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या.