Land record नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहित आहे जमिनीच्या बाबतीत महत्त्वाचे असणारे कागदपत्र म्हणजे सातबारा 7/12, आठ अ, फेरफार. या कागदांशिवाय जमिनीचा कोणत्याही व्यवहार होऊ शकत नाही. ही कागदी काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गावांमधील सीएससी केंद्र, महासेतू या ठिकाणी जाऊन काढावे लागायचे. परंतु आता राज्य सरकारने हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहेत.
भूमी अभिलेख विभाग
ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला सातबारा, आठ अ काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जावे लागते आणि तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता. आता सर्वच गोष्टी ऑनलाइन आणि कम्प्युटर आल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा आता सर्व कागदपत्रे ऑनलाईन केलेली आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमची जमिनीचे व्यवहार आणि इतर कामे करू शकतात. तर मित्रांनो आज आपण पाहूया की ऑनलाईन पद्धतीने सातबारा आठ अ फेरफार हे कसे काढायचे.
मित्रांनो राज्यातील जमिनीचे सर्व कागदपत्रे सांभाळण्याचे आणि त्यांना नियंत्रित करण्याचे काम भूमी अभिलेख विभाग करत असतो. याच अभिलेखाला आता ऑनलाईन पद्धतीने आपले सर्व कागदपत्रे ठेवता येतात. त्यामुळे तुम्हाला आता तहसील तलाठी कार्यांमध्ये जायची गरज नाही. यामुळे तुमचा वेळ पैसा आणि कष्ट दोन्ही वाचतात.
सातबारा, आठ अ डाऊनलोड कसे करायचे
मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपले भुलक या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुमचे तुम्हाला अकाउंट तयार करावे लागेल. अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, तुमचा चालू असलेला मोबाईल, नंबर ईमेल आयडी, जन्मतारीख तुमच्या घराचे संपूर्ण पत्ता, पिन कोड, तालुका आणि जिल्हा या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिथून सातबारा डाऊनलोड करू शकता. नोंदणी नंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो तिथे टाका आणि पाहिजे ते डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्या.
तुम्हाला सातबारा किंवा आठ अ काढण्यासाठी खालील पद्धतीने माहिती भरावी लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे विभाग विचारले जाईल महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण विभाग आहे जसे की छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक या विभागांपैकी जो तुमचा विभाग असेल तो तुम्हाला निवडावा लागेल. त्यानंतर जिल्हा निवडावा लागेल, तालुका निवडावा लागेल, गाव निवडावा लागेल, त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा कागद डाऊनलोड करायचा आहे, जसे की सातबारा आठ अ फेरफार यांपैकी एक निवडा. त्यानंतर जमिनीचा सर्वे नंबर टाका आणि डाऊनलोड या बटनावर क्लिक करा.
कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी लागणारी फीस
मित्रांनो डाऊनलोड या बटनवर क्लिक करा पूर्वी तुम्हाला अकाउंट मध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे. वेबसाईटवर तुमच्या अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर रिचार्ज करावा लागेल. प्रत्येक एका कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी सरकारी वेबसाईट तुमच्याकडून 15 रुपये घेईल. त्यासाठी तुम्ही त्याच्यात रिचार्ज टाका.
राज्य सरकारने ऑनलाईन दस्तावेज उपलब्ध करून दिल्यामुळे आता वेळेची बचत होत आहे. व्यवहारांमध्ये पारदर्शकता आलेली आहे. तुम्ही पाहिजे त्या ठिकाणाहून तुमचे कागदपत्र डाऊनलोड करू शकता. तुम्ही मिळू शकता आणि डिजिटल स्वरूपात कागद असल्यामुळे कागदपत्र हरवण्याची आता भीती नाही. वारंवार कार्याला जाऊन तिथे अर्ज करण्याची गरज नाही.
मित्रांनो यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की ऑनलाईन जी कागदपत्रे उपलब्ध आहे तीच तुम्हाला डाऊनलोड करता येतील. त्यानंतर कागदपत्र पाहण्यासाठी तुम्हाला बरोबर माहिती भरावे लागेल. त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे सुद्धा आवश्यक आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वाईज असणार सुद्धा आवश्यक आहे.