मुलींच्या जन्मानंतर मिळणार लाखो रुपये; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

Lek Ladki Yojana 2025 Application Process : माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून १ एप्रिल २०२३ पासून राज्य शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आणि बाल विवाह रोखणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना सरकारकडून टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? यासाठी पात्रता निकष काय याविषयी जाणून घेऊयात.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेतून किती लाभ मिळणार?

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजनेतील अटी आणि शर्ती

  • ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसंच, एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्याच्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यस एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, त्यानंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

    योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

    येथे क्लिक करा

  • १ एप्रिल २०२३ पर्वी एक मुलगा आणि मुलगी आहे आणि त्यानंतर जन्मला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील. यावेळी पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे.

    योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

    येथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावं.) यासाठी तहसिलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • रेशनकार्ड
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानतंर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.)
  • संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला.
  • पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment