LPG rate नमस्कार मित्रांनो आज आपण घरामध्ये वापरता येणाऱ्या घरगुती सिलेंडर गॅस दरांबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो गॅस सिलेंडरचे दर हे दर महिन्याला बदलत असतात. दर महिन्याचे नवीन दर हे भारतामध्ये असणारे पेट्रोलियम कंपन्या जसे की आयओसीएल एचपीसीएल बीपीसीएल ह्या कंपन्या ठरवतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नवीन दर जाहीर केले जातात.
तसं बघायला झालं तर गॅस सिलेंडर मध्ये दोन प्रकार असतात. एक तर घरगुती गॅस आणि दुसरा म्हणजे व्यवसायाकरिता हॉटेलमध्ये वापरला जाणारा गॅस. तर याला कमर्शियल गॅस असे म्हणतात. तर मित्रांनो सहसा घरगुती गॅस दर हे दर महिन्याला बदलत नाहीत. ते फिक्स ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असतं परंतु व्यवसायिक गॅस म्हणजेच कमर्शियल गॅस हा याचे दर महिन्याला रेट बदलत असतात.
कमर्शियल LPG सिलेंडरमध्ये दरकपात
तसंच मित्रांनो एक फेब्रुवारीला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस च्या दरांमध्ये काही बदल केलेले आहेत. या बदलाचा काय परिणाम झालेला आहे तर आज आपण याची माहिती घेऊ.
व्यावसायिक घास हा 19 किलो ग्रॅमच्या एलपीजी सिलेंडर मध्ये येतो आणि घरगुती गॅस हा 14.2 किलोग्रॅम च्या एलपीजी सिलेंडर मध्ये येतो. कमर्शियल गॅस हा व्यवसायासाठी म्हणजेच हॉटेल इतर ठिकाणी वापरला जात असल्याने याची क्षमता जास्त देण्यात आलेली आहे. एक फेब्रुवारी 2025 च्या जाहीर केलेल्या नवीन दरानुसार 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडर मध्ये सात रुपयांची घट करण्यात आली आहे. म्हणजेच मागच्या महिन्यापेक्षा आता ह्या महिन्यातील गॅस सिलेंडर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे.
या कमर्शियल गॅस ची किंमत दिल्लीमध्ये सध्या 1804 रुपयांवरून 1797 पर्यंत आली आहे. ही दर कपात झाल्यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायिक कामांना थोडा दिलासा मिळाला आहे.याच कमर्शियल गॅसची किंमत मुंबईमध्ये आधी 1756 रुपये होती आणि आता 1749.50 रुपये एवढी झाली आहे. कोलकत्यामध्ये याच कमर्शियल सिलेंडरची किंमत ही 1911 रुपये होती आणि आता ती 1907 झाली आहे.
सिलेंडरच्या दर वाढण्यामागे आणि कमी होण्यामागे काय कारणे आहेत ते पाहूया.
मित्रांनो या तेल कंपन्यांचा व्यवसाय आणि ह्यांचं सर्व कामकाज हे आंतरराष्ट्रीय होणाऱ्या बाजारपेठांमध्ये बदल यावर अवलंबून असतं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जर बदल झाले तर आपल्या भारतामध्ये सुद्धा गॅसच्या दरांमध्ये बदल होतात.
जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत वाढली तर आपल्या इथे एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ होती. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या त्याला घसरले तर इथेही त्याचे दर घसरले जातात. घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईमध्ये सध्या 14 kg च्या एलपीजी सिलेंडरची किंमत ही 802.50 इतके आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ही 818.50 एवढी आहे.
मित्रांनो जिल्हा नुसार घरगुती सिलेंडरचे दर खालील प्रमाणे दिलेले आहे तुम्ही पाहू शकता.
शहर |
दर |
अहमदनगर | 816.50 |
अकोला | 823 |
अमरावती | 836.50 |
छत्रपती संभाजी नगर | 811.50 |
भंडारा | 863 |
बीड | 828.50 |
बुलढाणा | 817.50 |
चंद्रपूर | 851.50 |
धुळे | 823 |
गडचिरोली | 872.50 |
गोंदिया | 871.50 |
मुंबई | 802.50 |
हिंगोली | 828.50 |
जळगाव | 808.50 |
जालना | 811.50 |
कोल्हापूर | 805.50 |
लातूर | 827.50 |
मुंबई शहर | 802.50 |
नागपूर | 854.50 |
नांदेड | 828.50 |
नंदुरबार | 815.50 |
नाशिक | 806.50 |
धाराशिव | 827.50 |
पालघर | 814.50 |
परभणी | 829 |
पुणे | 806 |
रायगड | 813.50 |
रत्नागिरी | 817.50 |
सांगली | 805.50 |
सातारा | 807.50 |
सिंधुदुर्ग | 817 |
सोलापूर | 818.50 |
ठाणे | 802.50 |
वर्धा | 863 |
वाशिम | 823 |
यवतमाळ | 844.50 |
मित्रांनो आपण पाहिलं असेल की प्रत्येक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये काही फरक दिसून येतो. हा फरक प्रामुख्याने वाहतुकीसाठी होणारा खर्च स्थानिक कर आणि प्रशासकीय खर्चामुळे होतो. कोलकत्यामध्ये घरगुती सिलेंडरचे दर हे जास्त आहेत आणि मुंबईमध्ये स्वस्त आहेत कारण मुंबई मध्ये वाहतूक जवळ आहे समुद्र जवळ आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सोपे होते आणि दर कमी राहतात.
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास करतात डॉलरची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये होणाऱ्या घडामोडी यांवरून दर महिन्याला नवीन किंमत ठरवली जाते.