Mahsul Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्ही चांगल्या सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल, तर ही एक मोठी संधी आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठ (बृहन्मुंबई) आणि इतर खंडपीठ (पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर) मध्ये रिक्त असलेल्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांवरील नियुक्त्यांसाठी जाहिरात जारी केली आहे.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
या भरतीसाठी ऑनलाईन अधिकृत वेबसाईट [email protected] वर अर्ज करण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२५ सुरु झाली असून शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदांचा तपशीलः
1. बृहन्मुंबई (मुख्य खंडपीठ):
– अध्यक्ष (सद्यस्थितीः संभाव्य रिक्त होणारे)
– सदस्य (न्यायिक) (रिक्त)
– सदस्य (प्रशासकीय) (रिक्त)
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
2. पुणे खंडपीठः
– सदस्य (न्यायिक) (रिक्त)
– सदस्य (प्रशासकीय) (संभाव्य रिक्त होणारे)
3. छत्रपती संभाजी नगर खंडपीठः
– सदस्य (न्यायिक) (संभाव्य रिक्त होणारे)
– सदस्य (प्रशासकीय) (रिक्त)
4. नागपूर खंडपीठ:
– सदस्य (न्यायिक) (रिक्त)
– सदस्य (प्रशासकीय) (संभाव्य रिक्त होणारे)
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
निवड प्रक्रियाः
या पदांसाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ नुसार केली जाईल, उमेदवारांची अर्हता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक निकष संबंधित नियमांनुसार असतील. अधिक माहितीसाठी Mahasul Van Vibhag Bharti 2025 Notification pdf पाहू शकतात.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
वेतन आणि भत्तेः
पदांसाठी वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्ती संबंधित शासन निर्णयांनुसार असतील. खालील शासन निर्णयांमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे:
– शासन निर्णय क्रमांक एमआरटी १००७/प्र.क्र.८९/टी-१, दि. ०१/०२/२००८
– शासन निर्णय क्रमांक एमआरटी १००७/प्र.क्र.८९/टी-१, दि. १७/०३/२०१२
– शासन निर्णय क्रमांक- एमआरटी २०१३/प्र.क्र.२३६/टी-१, दि. ३०/०३/२०१६