महिलांना मिळणार ड्रोन खरेदीसाठी 8 लाख रुपयांचे अनुदान लगेच अर्ज करा

Namo drone scheme नमस्कार मित्रांनो आपला तर माहीतच आहे की, केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती व्हावी आणि त्यांची जीवनमान अजून अधिक चांगल्या प्रकारे सुधारावे यासाठी विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठीही राज्य सरकार, केंद्र सरकार नवनवीन योजना आणत असतं. अशीच एक योजना केंद्र सरकारने आणलेली आहे ती म्हणजे ड्रोन खरेदी.

योजनेची उद्दिष्टे Objectives

मित्रांनो तंत्रज्ञान एवढं प्रगत होत गेले आहे की आता तुम्हाला शेतामध्ये पिकांना फवारण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. हवेतील ड्रोन हे आता पिकांवरती उडून त्यांच्यावरती सर्व रासायनिक आहे वरून फवारतील. या आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीला ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणतात आणि या ड्रोन द्वारे तुम्ही शेतामध्ये फवारणी करू शकता. याची स्पीड खूप जास्त असल्याने तुम्ही कमी वेळात जास्त फवारणी करू शकतात.

या ड्रॉची किंमत मार्केटमध्ये खूप जास्त असल्याने शेतकरी त्याला विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता यांच्या खरेदीवर अनुदान देण्याचे ठरवलेले आहेत. तर मित्रांनो आज आपण याचबद्दल संपूर्ण माहिती घेऊन अनुदान कसे दिले जाईल किती दिले जाईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाईल. मित्रांनो केंद्र सरकारने सुरू केलेली “नमो ड्रोन दीदी योजना” ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी चालू केलेली आहे. यामध्ये महिलाच या ड्रोन खरेदी करू शकतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने हे आखलेले धोरण आहे.

या योजनेची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आली. या योजनेच्या नियमानुसार येणाऱ्या चार वर्षांमध्ये देशातील 15000 महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मित्रांनो ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकारने 1261 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सुलभ करणे.

अनुदान आणि किंमत Grant and price

मित्रांनो मार्केटमध्ये ड्रोन ची किंमत जास्त असल्याने केंद्र सरकारने आता दोन खरेदीसाठी 80 टक्के अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आठ लाखांपर्यंत अनुदान मिळते. आणि जर तुमच्याकडे उरलेले रक्कमही नसेल तर बचत गटांना तीन रुपये टक्के व्याजदराने कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. त्यामुळे आता डॉन खरेदी करणे महिला बचत गटांना परवडणारे आहे.

या ड्रोन ची किंमत दहा लाखांच्या घरात असल्याने वैयक्तिक माणूस याला खरेदी करू शकत नाही त्यामुळे महिला बचत गटांनाच राज्य सरकार केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. या योजनेचा लाभ फक्त महिला बचत गटांनाच घेता येणार असल्याने आता बचत गटांचे उत्पन्न वाढेल त्यांच्या उत्पन्नामध्ये भर होईल आणि सर्व महिलांना फायदा होईल

मासिक पगार आणि उत्पन्न Monthly salary and income

मित्रांनो यामध्ये ड्रोन चालवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे दहा ते पंधरा गाव मिळून एक ड्रोन सखी नावाने महिलांची नियुक्ती करण्यात येईल.
जी महिला ड्रोन चालवेल अशा महिलांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जे उत्पन्न तयार होईल ते बचत गटामध्ये सर्वांना समान येईल.

ड्रोन चा वापर वाढल्याने खते आणि कीटकनाशकांची फवारणी एकदम व्यवस्थित पद्धतीने होईल यामध्ये तुम्हाला श्रमाची आणि टायमाची बचत होईल यामध्ये पिकाचे उत्पादन वाढेल आणि शेतीची उत्पादकता सुद्धा सुधारेल

या योजनेची सुरुवात आता राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमधून झाली आहे. हळूहळू महाराष्ट्र मध्ये या योजनांचा सुरुवात झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर पसरवली जाणार आहे.या योजनेचा लाभ फक्त महिला बचत गटांनाच घेता येणार असल्याने आता बचत गटांचे उत्पन्न वाढेल त्यांच्या उत्पन्नामध्ये भर होईल आणि सर्व महिलांना फायदा होईल.

Leave a Comment