19 व्या हफ्त्याची तारीख जाहीर ! खात्यात जमा होणार 2000 रुपये यादीत नाव पहा

PM kisan status नमस्कार मित्रांनो आपल्याला जर माहीतच आहे, की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी यासाठी विविध योजना राबवत असतं. अशाच योजनांपैकी एक योजना म्हणजे पी एम किसान महासन्माननीय योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये जमा केले जातात. म्हणजेच वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होतात.

मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 18 हप्ते जमा झालेले आहेत. याचाच अर्थ आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 36 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळालेले आहेत. आता 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याची तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु येणाऱ्या 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे.

चला तर मित्रांनो या योजनेबद्दल माहिती घेऊया.

भारतभरातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना चालू केली. या योजनेअंतर्गतचा 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 प्रमाणे प्रत्येकी चार महिने नंतर जमा केले जातात.

लाभार्थी शेतकरी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम सरकारने घालून दिलेले आहेत. पहिला नियम म्हणजे लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरीमध्ये असला नाही पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जे शेतकरी आयकर भरतात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेअंतर्गत एका कुटुंबांमधील केवळ एकाच शेतकरी ला या योजनेचा लाभ घेता येईल यामध्ये एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.

ई केवायसी करणे बंधनकारक

ही योजना जेव्हा सुरू केली होती, तेव्हा या योजनेअंतर्गत केवायसी साठी कोणतीही अपडेट नव्हते. परंतु आता इ केवायसी करणे या योजनेसाठी बंधनकारक झालेले आहे. E केवायसी केल्याने शेतकऱ्याची ओळख पटते आणि खरोखर लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. अनेक शेतकऱ्यांनी अजून पर्यंत इ केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत नाहीत, कृपया आपली केवायसी करून घ्या.

ई केवायसी करण्यासाठी प्रोसिजर खूप सोपे आहे तुम्ही तुमच्या गावातील कॉमन सर्विस सेंटर सीएससी केंद्रावर जाऊन ही केवायसी करू शकता. किंवा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे आधार नंबर टाकून तुम्हाला ओटीपी आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता.

मिळालेले हप्ते

मित्रांनो केंद्र सरकारने आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक वेबसाईट तयार केलेले आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत, याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

  • होम पेजवरील किसान कॉर्नर या बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या वाटणावर क्लिक करा
  • तिथे तुम्हाला आधार नंबर किंवा नोंदणीकृत केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल
  • गेन डाटा या बटन वर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहे ते संपूर्ण माहिती दिसेल.

 फार्मर आयडी बनवणे बंधनकारक

मित्रांनो केंद्र सरकारने आत्ताच दिलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी सुद्धा बनवावा लागणार आहे. हा फार्मर आयडी बनवल्यानंतरच येणाऱ्या काळात पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. फार्मर आयडी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्र माहिती जाऊन माहिती देऊ शकता. आणि तिथून कार्ड बनवून घेऊ शकता. तुम्हाला फार्मर आयडी बनवण्यासाठी आधार कार्ड आणि जमिनीचे आठ सात बारा या गोष्टी लागतील आणि चालू मोबाईल नंबर लागेल

Leave a Comment