PM Vishwakarma yojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार हे नेहमीच भारतातील लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असतं. अशाच योजनांमधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. ही योजना पंतप्रधान यांनी विशेषतः कारागीर लोकांसाठी बनवलेले आहे. कारागीर बांधवांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी ही योजना सरकारने चालू केली.
Scheme ID card and certificate योजनेचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र
या योजनेअंतर्गत कारागीर बांधवांना आर्थिक मदत केली जाते. त्यांना त्यांच्या कामासाठी प्रशिक्षण सुद्धा दिला जातं आणि त्यांनी जे उत्पादन बनवलेला आहे ते बाजारपेठेची जोडण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. ही योजना विशेषता पारंपारिक कारागिरांसाठी बनवलेले आहे. जेव्हा तुम्ही या योजनेमध्ये भाग घेतला तेव्हा तुम्हाला या योजनेअंतर्गत विशेष ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिला जाईल.
हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कारागिरांना एक अधिकृतता मिळेल. आणि सरकारी काम जर घ्यायचे असेल तर त्यामध्ये त्याचा फायदा होईल. या योजनेचा लाभ घेतल्याने कारागिरांना त्यांचे कौशल्य जतन करता येईल आणि आधुनिक बाजारपेठेची जोडता येईल. त्यांचे उत्पादन भारतात आणि भारताबाहेर विकल्या जाईल. त्यांचे उत्पादन जेवढे जास्त विकला जाईल तेवढा जास्त फायदा कारागिरांना होईल.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र याचे महत्त्व खूप देण्यात आलेले आहेत. विविध सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी हे तुम्हाला मदत करतील. बँकेमधून कर्ज घेण्यासाठी ओळखपत्र तुम्हाला मदत करेल. विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र हे आवश्यक असेल. आणि सरकारने चालू केलेल्या कोणत्याही योजनांचे अनुदान घेण्यासाठी तुम्हाला दोन्ही कागदपत्रे लागतील.
How to Apply ऑनलाइन अर्ज कसा करायचा
मित्रांनो या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा डॉट जीओव्ही डॉट इन https://pmvishwakarma.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर नवीन नोंदणी रजिस्टर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका पडताळणीसाठी तुम्हाला ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल तो ओटीपी तिथे भरा आणि तुमच्या अकाउंट तयार करून घ्या.
त्यानंतर तुम्हाला तिथे वैयक्तिक माहिती विचारली जाईल जसे की नाव, जन्मतारीख, घराचा पत्ता, ते संपूर्ण माहिती टाका. आधार कार्ड वर नाव ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे नाव टाका. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती द्यावी लागेल जशी की कारागिराचा प्रकार आणि अनुभव किती आहे या गोष्टींची माहिती द्या त्यानंतर बँक खात्याची माहिती तुम्हाला तिथे द्यावी लागेल.
तिथे दिलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी करून तुम्हाला अपलोड करावी लागेल. ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अर्ज हे संबंधित विभागाकडून तपासले जातील. त्यानंतर योग्यतेनुसार अर्जाची मंजुरी होईल आणि तुम्हाला ओळखपत्र आणि प्रमाणपत्र जारी केले जाईल.
सरकारने जाहीर केलेले हे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला परत एकदा पीएम विश्वकर्मा या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे टाका आणि तुमचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र डाऊनलोड करून घ्या.
Benefits of the scheme योजनेचे फायदे
या योजनेचे काही विशेष फायदे आहेत जसे की तुम्हाला अधिक माहिती आणि अधिक नॉलेज अधिक स्किल शिकण्यासाठी मदत करेल तसेच तुम्हाला व्यवसायासाठी लागणारे कर्ज हे अत्यल्प दरात उपलब्ध होईल.
या योजनेअंतर्गत तुम्हाला अजून ऍडव्हान्स प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून तुमच्या उद्योगधंदे त्याची मदत होईल. यानंतर तुम्हाला ऑनलाईन बाजारपेठेमध्ये आपली वस्तू कशी विकायची याचे प्रशिक्षण दिले जातील. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रदर्शन मिळावे परवले जातील.
सरकारला काही वस्तू खरेदी करायचे असल्यास आपल्याला प्राधान्य दिले जाईल.
या योजना अंतर्गत मिळणारे कागदपत्र जपून ठेवा. त्यानंतर या वेबसाईटचा अधिकृत वेबसाईट सतत जात रहा. जेणेकरून तुम्हाला नवनवीन ज्या योजना चालू होतील, या संदर्भात माहिती होत राहील आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.