पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क

Post office saving scheme मित्रांनो आपण सध्या बाजारामध्ये विविध बचत योजना, गुंतवणूक योजना यांची माहिती नेहमी वाचत ऐकत असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्युचल फंड मध्ये टाका, स्टॉक मार्केटमध्ये टाका, पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये टाका, बँकेमध्ये FD करा अशा विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असतात.

तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिस म्हटलं की सुरक्षितता तुमच्या गुंतवणुकीला काहीच होणार नाही. कारण पोस्ट ऑफिस हे सरकारी आहे आणि गुंतवणुकी तुमची होणार आहे ती पण सरकारीच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो परतावा मिळणार आहे तो 100%.

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि गुंतवणुकीबद्दल टेन्शन फ्री राहायचे असेल, तर पोस्ट ऑफिस ने तुमच्यासाठी एक खास योजना आणलेली आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना Post office time deposit scheme.

योजनेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती 

पोस्ट ऑफिस ची ही सर्वात जास्त सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत पैसे तुमचे गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा टाईम पिरेड तुम्ही ठरवू शकता. परंतु हा टाईम पिरेड एक ते पाच वर्षांच्या मध्येच असला पाहिजे. सध्या सर्वात जास्त लोक या योजनेचा फायदा घेत आहेत.

कालावधी आणि व्याजदर Duration and interest rate

या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर याचा व्याजदर हा एका वर्षाच्या कालावधीसाठी हा 6.9% एवढा आहे. तर दोन वर्षाच्या कालावधीसाठी हा 7% आहे. तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा 7.1% आहे आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक व्याजदर 7.5% आहे.

मित्रांनो या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला एक तीन आणि पाच अशा पटींच्या वर्षांमध्येच गुंतवणूक करायला लागेल म्हणजे एक वर्ष तीन वर्षे पाच वर्षे 10 वर्षे 15 वर्ष अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आपण एक गणित पाहू ज्याच्यामध्ये आपलं कळेल की परतावा किती मिळेल.

गुंतवणूक आणि परतावा Investment and returns

  • जर तुम्ही या योजनेमध्ये दहा लाख रुपये पंधरा वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला किती त्याचा नफा मिळेल पाहू. पहिली पाच वर्षात तुमची मूळ गुंतवणूक असेल दहा लाख रुपये. व्याजदर असेल 7.5% पाच वर्षानंतर एकूण रक्कम होईल 14 लाख 49 हजार 948 रुपये आणि तुमचे निव्वळ व्याज तयार होईल चार लाख 49 हजार 948 रुपये.
  • त्यानंतर आता पुढचे पाच वर्ष म्हणजे मूळ रक्कम झाली 14 लाख 49 हजार 948 रुपये व्याजदर झाला 7.5% वार्षिक त्यानंतर एकूण दहा वर्षानंतर तुमच्या रक्कम होती 21 लाख 52 हजार 349 रुपये तुम्हाला एकूण निव्वळ व्याज 11 लाख 52 हजार 3009 रुपये झाले आहे.
  • आता पुढच्या पंधरा वर्षासाठी आता तुमची मूळ रक्कम आहे 21 लाख 52 हजार 349 रुपये व्याजदर झाला 7.5% वार्षिक त्यानंतर 15 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम झाली तीस लाख 48 हजार 297 रुपये आणि एकूण व्याज झालं 20 लाख 48 हजार 297 रुपये.

योजनेची  वैशिष्ट्ये

या योजनेची जर आपण वैशिष्ट्ये पाहायला गेलो तर यामध्ये 100% सुरक्षितता त्यानंतर लवचिक कालावधी आहे गरजेनुसार तुम्ही एक ते पाच वर्षांचा कालावधी निवडू शकता. त्यानंतर मुदत संपल्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी वाढून घेऊ शकता आणि यामध्ये नियमित उत्पन्न आहे म्हणजेच तुम्ही व्याजदर हा ती माहिती किंवा वार्षिक स्वरूपात मिळू शकतात.

या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी लागेल. जाताना आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि पत्त्याचा पुरावा लागेल तुमची किमान गुंतवणुकी एक हजार रुपयांपासून चालू होईल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला कमाल मर्यादा नाही तुम्ही पाहिजे तेवढे पैसे गुंतवू शकतात

Leave a Comment