Ration card yadi राज्यातील अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना होळी सणानिमित्त राज्य सरकारने मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. तथापि, दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांतील लाभार्थ्यांना होळी तसेच गुढीपाडवा होऊन एक महिना उलटूनही या साड्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता ही योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या साड्यांचे वितरण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. दिंडोरी तालुक्यात एकूण १३ हजार १२७ महिला लाभार्थी असून, त्यांच्यासाठी ८ एप्रिल रोजी साड्या तालुका स्तरावरील गोदामात दाखल झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना नायब तहसीलदार आणि तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी सांगितले की, १४ एप्रिलपर्यंत १७३ पैकी ७३ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ६ हजार ९५ साड्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित १०० दुकानांमध्ये साड्या पोहोचवण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
दुसरीकडे, पेठ तालुक्यात १० हजार ७८२ लाभार्थ्यांसाठी ९ एप्रिल रोजी साड्यांचा साठा प्राप्त झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या साड्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे वितरण लाभार्थ्यांपर्यंत केले जाईल.
दरम्यान, होळी सणासाठी घोषित करण्यात आलेली ही साडी वाटप योजना प्रत्यक्षात सुमारे महिनाभर उशिराने सुरू असल्याने, या भागातील ‘लाडक्या बहिणीं’ना होळीऐवजी आता अक्षय तृतीयेला या साड्या मिळण्याची शक्यता आहे.
रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
वणी येथील परिस्थिती वेगळी नाही. येथे अंत्योदय योजनेचे एकूण ६६९ लाभार्थी असून, त्यापैकी ६५० साड्या प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या साड्यांचे वितरण लाभार्थ्यांना २१ तारखेपासून धान्यासोबतच केले जाणार आहे.
या दिरंगाईमुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आहे. एका महिलेने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “शासनाने होळीच्या भेटवस्तू म्हणून मोफत साडी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही वारंवार रेशन दुकानदारांकडे साडी आली आहे की नाही याची विचारणा करत होतो. आता महिना उलटला तरी माझ्या भावाची लाडकी बहीण अजूनही साडीच्या प्रतीक्षेत आहे.”