Retirement age नमस्कार मित्रांनो सर्वांनाच आता सरकारी नोकरी हवी असते. परंतु आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा खूप वाढली आहे. हे जग आता स्पर्धात्मक युगाचे आहे. मित्रांनो सरकारी नोकरी मिळण्याच्या नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रिटायरमेंट चे वय म्हणजे तुमची निवृत्ती कोणत्या वयाला होणार. निवृत्तीची वय जेवढे जास्त अधिक असेल तेवढा जास्त फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होतो आणि यासंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
निवृत्तीचे वय 58 वरून 60
राज्य सरकारने घेतलेला वय वाढीचा निर्णय हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल.आता सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय हे 58 वरून 60 वर्षे करण्यात आले आहे. हा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. या गोष्टीमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.हा निर्णय अमलात आणण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली आहे.
आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वर्ष एवढे होते. या निर्णयाविरुद्ध काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालय धाव घेतली आणि वय वाढीवर बोट ठेवले. विशेषतः दहा मे 2001 पूर्वी आणि नंतर सरकारी नोकरीला नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वया मर्यादा मध्ये मोठी तफावत होती जी अन्यायकारक होती.
हिमाचल प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने यासंदर्भात संपूर्ण सुनावणी ऐकून घेतली आणि केली त्यानंतर दोन्ही बाजूंचा विचार करून एक ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयात असे सांगण्यात आले आहे की 2001 पूर्वी आणि नंतर सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे साठ वर्षापर्यंत असावे आणि सर्वांना समान अधिकार मिळावा. पुढे न्यायालयाने असे नमूद केले की नियुक्तीच्या तारखेवरून त्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये तफावत करणे हे म्हणजे घटनात्मक तरतुदीचे उल्लंघन आहे.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हिमाचल राज्य सरकारने या आदेशाची अंमलबजावणी लगेच केली. या निर्णयामुळे हिमाचल प्रदेश मधील सर्व श्रेणीतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळेल आणि विशेषतः चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
निवृत्ती वय वाढीमुळे होणारा फायदा
या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठे बदल होतील दोन वर्षे वाढल्याने त्यांना नियमित वेतन महागाई भत्ता आणि इतर पत्ते मिळत राहतील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वय जास्त असल्याने त्यांची पगारामध्ये सुद्धा मोठी वाढ होईल आणि त्यांचा फायदा त्यांना निवृत्तीच्या वेळेस पेन्शन मिळताना होईल.
हिमाचल प्रदेश राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता निवृत्ती वय 60 आहे आणि यामुळे मानसिक तणाव बऱ्यापैकी कमी होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अजून दोन वर्ष सेवा करण्याची संधी मिळेल. निवृत्ती वय वाढल्याने राज्य सरकारने त्याचा फायदा होईल जेणेकरून अनुभवी कुशल अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा सरकारी निर्णय घेण्यासाठी होईल आणि ती त्यांची महत्त्वाची भूमिका बजावतील.
बेरोजगार तरुणांसाठी नियोजन
परंतु या घेतलेल्या निर्णयामुळे काही नकारात्मक गोष्टी सुद्धा घडतील जसे की तरुणांवर बेरोजगारीचे प्रमाण वाढेल कारण की नवीन नियुक्त करणे सरकारला अवघड जाईल. अशा बाबतीतील सरकारने योग्य ते नियोजन करून तरुणांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने घेतलेला निर्णय हा संपूर्णतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे आणि त्यांचे जीवनमान यामुळे नक्कीच सुधारेल त्याबरोबर सरकारने बेरोजगार तरुणांची ही काळजी करणे आवश्यक आहे.