State Bank RD Scheme 2025 नमस्कार मित्रांनो SBI एसबीआय बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आणि विश्वसनीय बँक आहे. SBI बँक सरकारी बँक म्हणून सुद्धा ओळखली जाते.
या बँकेचे असणारे योजना, तिथे आपण ठेवलेले ठेवी या सर्व सुरक्षित असतात. त्यामुळे आपण डोळे झाकून एसबीआय बँक वर विश्वास ठेवून त्या बँकेमध्ये पैसे गुंतवू शकतो.
एसबीआय बँक ही सरकारी असल्यामुळे ती विविध योजना लोकांसाठी राबवत असते आणि विविध पैशांच्या गुंतवणुकीच्या स्कीम ही काढत असते. जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. अशीच एक योजना एसबीआय बँकेने काढलेली आहे. प्रत्येक माणसालाच पैसे कमावण्याची इच्छा असते लखपती व्हावं वाटतं आता या योजनेचे माध्यमातून तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करू शकता. या योजनेचे नाव आहे “हर घर लखपती योजना” याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊ.
हर घर लखपती योजना ही एक लहान बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही रिकरिंग डिपॉझिट RD च्या माध्यमातून पैसे जमा करू शकतात. यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेमध्ये जमा करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला एक फिक्स रक्कम बँकेमध्ये जमा करू शकता.
या योजनेचा उद्देश म्हणजे लोकांना बचत करण्याची सवय लावणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
योजनेचा व्याजदर
या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम भरल्यानंतर तुम्ही यामधून एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता. ही योजना तुम्हाला तीन ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचे असल्यास कमीत कमी दर महिन्याला तुम्हाला 591 रुपये ही गुंतवणूक करावी लागेल. या योजनेमध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवात असाल तर तुम्हाला व्याजदर हे 6.75% सामान्य नागरिकांसाठी दिले जाते आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असेल तर तुमच्यासाठी 7.25 टक्के एवढे व्याजदर मिळेल.
या योजनेचे खाते कसे ओपन करायचे
या योजनेमध्ये सर्व वयोगटातील लोक सहभागी होऊ शकतात. खाते उघडण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि तुमचे वय हे दहा वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये आपल्याला गुंतवणूक करायचे असल्यास खूप सोपे आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन तिथे अर्ज करू शकता. जर तुम्हाला बँकेत जायचे नसेल आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकते. यामध्ये तुम्ही नेट बँकिंग मोबाईल बँकिंग चा वापर करून पैसे गुंतवू शकता.
एसबीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी युनो ॲप हे काढलेल्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही विविध व्यवहार करू शकतात तसेच या योजनेमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता.
योजनेचे होणारे फायदे
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दर महिन्याला बचत करण्याची सवय लागेल त्यानंतर एसबीआय बँके सरकारी असल्यामुळे तुमचे जे गुंतवणूक झालेले आहे ते संपूर्ण सुरक्षित असेल आणि यामध्ये तुम्हाला गॅरेंटेड परतावा मिळेल.
या योजनेतून मिळणाऱ्या पैशांवर तुम्हाला कर लागणार नाही. या योजनेमध्ये लवचिकता देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहिजे तेवढे पैसे दर महिन्याला या योजनेमध्ये गुंतवू शकता.
ही योजना नोकरी करणारे जे लोक आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यांना बचत करणे खूप आवश्यक असते त्यानंतर लहान व्यापारी यांना सुद्धा दरमहा बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यानंतर मित्रांनो गृहिणी यांना घराघरातून बचत करून, या योजनेमध्ये त्या गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर विद्यार्थी सुद्धा त्यांना दर महिन्याला मिळणारे खर्चाच्या पैशांमधून थोडी बचत करून या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.