Success story of upsc crack birdev dhone खांद्यावर घोंगडी, डोक्यावर टोपी, कमरेला पाण्याची लोकरची पिशवी आणि पायात जाड चप्पल असा एका साध्या मेंढपाळाचा मुलगा… ज्याचं घर म्हणजे आभाळाचं छत आणि धरतीची पायवाट. असा हा मुलगा मेंढ्या चराईच्या कामात रानोमाळ भटकंती करायचा. पण या मुलाने आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर थेट आयपीएस अधिकारी बनून दाखवलं आहे. ‘मेंढरं राखणारा पोरगा आता साहेब झाला’ असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
दोन वेळा अपयश आलं, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. जेव्हा तो गावात परतला, तेव्हा त्याचे जंगी स्वागत झाले. यावेळी त्याची बहीण आणि संपूर्ण गाव भावुक झालेलं दिसलं. अनेक पिढ्यांपासून असलेलं दुःख बिरदेव ढोणे याने आपल्या यशातून संपवलं आहे. हा प्रेरणादायी क्षण पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
त्याचे वडील मेंढपाळ होते. घरात कोणतीही सोय नव्हती, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट होती. पण बिरदेवच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. लहानपणापासूनच त्याला अधिकारी व्हायचं स्वप्न होतं आणि अखेर या मेंढपाळाच्या मुलाने ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं. बिरदेवने संघर्षातून घेतलेली ही मोठी झेप निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर बिरदेवच्या सत्काराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून कुणालाही गहिवरून येईल.
प्रत्येकाला कधी ना कधी अपमानाला सामोरं जावं लागतं. कधी आपली चूक नसताना, तर कधी आपल्या चुकीमुळे अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी आपण तो अपमान गिळतो, पण तो कधीही विसरत नाही. काही लोक चुकीच्या मार्गाने याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात, पण खरं तर यश मिळवणं हाच सर्वात मोठा बदला असतो, हे सगळ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात, जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. कोल्हापूरच्या यूपीएससी क्रॅक केलेल्या बिरदेव ढोणेची कहाणी अशीच आहे. ज्या बिरदेव ढोणेची साधी तक्रारही पोलिसांनी घेतली नव्हती, तोच बिरदेव ढोणे आज एक आयपीएस अधिकारी बनला आहे.