Toll plaza viral video टोल प्लाझा अनेकदा विविध घटनांमुळे चर्चेत असतात. नुकतीच उत्तर प्रदेशातील हापूर येथील छिजरसी टोल प्लाजावर एक घटना घडली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला टोल कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. ही महिला अवघ्या चार सेकंदात त्या कर्मचाऱ्याला सात वेळा चापट मारताना दिसत आहे आणि या अनपेक्षित हल्ल्यामुळे टोल कर्मचारी पूर्णपणे गोंधळलेला दिसत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल व्हिडिओनुसार, संबंधित महिलेच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे वाद झाला. यानंतर महिला टोल प्लाझाच्या बूथमध्ये घुसली आणि तिने कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याने महिलेला टोलचे पैसे भरण्यास सांगितल्यावर ती अधिक संतप्त झाली आणि बूथमध्ये घुसून तिने त्याला अनेक थप्पड लगावले.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिला गाजियाबादहून येत होती आणि टोल भरण्याऐवजी तिने तीन टोल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक युजर्सनी या कृत्याचा निषेध केला आहे आणि महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एका वापरकर्त्याने आश्चर्य व्यक्त करत टिप्पणी केली, “४ सेकंदात ७ थप्पड? इतक्या वेगाने तर ॲक्शन चित्रपटसुद्धा पुढे सरळत नाहीत!” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने उपहासात्मक प्रश्न विचारला, “ही टोल भरण्याची नवीन पद्धत आहे का?” तिसऱ्या एका वापरकर्त्याने नाराजी व्यक्त करत म्हटले आहे, “फक्त ती महिला आहे म्हणून तिला काहीही करण्याचा हक्क आहे का? हे खूपच जास्त आहे!”