Train accident viral video चालत्या ट्रेनमधून उतरताना जीव गेल्याच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने देशभर होत असतात. रेल्वेचं जाळं देशभर विस्तारलं असल्याने रोज रेल्वे अपघात होत असतात. या अपघातांचे व्हिडिओही समोर येत असतात. पण या अपघातातून वाचवणारे देवदुतही रेल्वे स्थानकांवर उभे असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मुंबईतील बोरीवली स्थानकातही असाच प्रकार घडला आहे. चालत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिला प्रवाशाचा रेल्वे सुरक्षा रक्षकाने जीव वाचवला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
बोरीवली स्थानकातून एक एक्स्प्रेस पुढच्या दिशेने निघाली. त्यावेळी चालत्या ट्रेनमधून एक महिला उतरण्याचा प्रयत्न करत होती. तिचा हा प्रयत्न स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिला. रेल्वेतून उतरताना तिचा तोल गेल्याने ती थेट ट्रेनखाली म्हणजेच रुळांवर पडणार होती. पण तेवढ्यात पोलीस कर्मचाऱ्याने धावत जाऊन तिला ट्रेनखाली जाण्यावाचून वाचवलं.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अधिकृत एक्स खात्यावरून हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील बोरीवली रेल्वे स्थानकावर एक महिला चालत्या ट्रेनमधून उतरत असताना तिचा तोल गेल्याने ती फलाटावर पडली. तेव्हा तिथे कर्तव्यावर असलल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याने तिला वाचवलं. त्यामुळे कृपया चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू नका; असं आवाहन रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.