या कुटुंबांना मिळणार 600 रुपये मध्ये सिलेंडर गॅस यादीत नाव पहा

Ujjwala gas cylinders नमस्कार मित्रांनो भारत सरकार गरीब कुटुंबांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना सवलतीच्या दरामध्ये गॅस सिलेंडर हे दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 9.6 कोटी लाभार्थ्यांना कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहे. 2026 या वर्षासाठी केंद्र सरकारने 10.35 कोटी कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार 75 लाख कनेक्शन अधिकचे देण्याचे विचार करत आहे.या योजनेची पार्श्वभूमी म्हणजे मे 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने योजना सुरू केली. खेडेगावांमधील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी लाकूड, कोळसा, शेणाच्या गवऱ्या अशांचा वापर करावा लागत होता. यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर खूप मोठा परिणाम होता. जाळलेल्या नंतर निघालेल्या धुरातून डोळ्यांना काही काळानंतर अंधत्व येत होते.

तसेच लाकूड कोळसा या सर्व गोष्टी निसर्ग पासूनच मिळत असल्याने निसर्गाची हानी खूप मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रश्नावर उत्तर म्हणून सरकारने स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही चालू केली. आणि या अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गॅस देण्याचे ठरवले. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 14.2 किलो सिलेंडरचा गॅस हा 1600 रुपयांना किंवा पाच किलो सिलेंडर साठी 1150 रुपये दिले जातात. या गॅस सोबत तुम्हाला प्रेशर रेगुलेटर एलपीजी नळी ग्राहक कार्ड इन्स्टॉलेशन या सर्व गोष्टी फ्री दिल्या जातात. या योजनेचे विशेष म्हणजे गॅस घरी आणल्यानंतर पहिला गॅस संपल्यानंतर जो दुसरा गॅस मिळेल तो पण फ्री असतो आणि दिलेला सोबत असतो सुद्धा फ्री दिला जातो.

प्रधानमंत्री उज्वला योजनेची पात्रता Eligibility for Pradhan Mantri Ujjwala Yojana

मित्रांनो या योजनेची पात्रता पाहूया ही योजना फक्त महिलांसाठी चालू केलेली आहे.

  • महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन घ्यावे लागते महिलेचे वय हे किमान 18 वर्षे असावे लागेल.
  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अति मागासवर्गीय किंवा अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब लाभ घेऊ शकतात.
  • ज्या कुटुंबांना घरकुल योजना लागू झालेले आहे असे कुटुंब सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • तसेच चहा बागांमधील कामगार आणि वनवासी कुटुंबे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • यानंतर बेटे नदी किनारी राहणारे कुटुंब लाभ घेऊ शकतात.
  • एकच घरामध्ये दोन एलपीजी कनेक्शन देता येणार नाही.

कागदपत्रे Documents

या योजनेसाठी अर्ज करायला तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. ती खालील प्रमाणे आहेत.

  1. तुम्हाला आधार कार्ड लागेल ओळखपत्र
  2. पत्त्याचा पुरावा लागेल
  3. त्यानंतर राशन कार्ड त्यानंतर तुम्हाला
  4. स्वयंघोषणापत्र द्यावे लागेल
  5. आसाम आणि मेघालय राज्यासाठी आजाराऐवजी राज्य सरकारी शिधापत्रिका मान्य असेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करून तुमच्या जवळच्या गॅस सिलेंडर वितरण केंद्रात जाऊन अर्ज भरू शकता.
अर्ज वितरण केंद्रात जाताना वरील सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा आणि अर्ज करा.

मित्रांनो केंद्र सरकारने ही योजना चालू करून महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा केली. त्यानंतर स्वयंपाक घरात जे प्रदूषण होत होते. ते कमी झाले आणि गॅसची उष्णता जास्त असल्याने तुम्हाला स्वयंपाक करायला कमी वेळ लागतो यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते. त्यानंतर लाकूडतोड होत नसल्याने पर्यावरणाचे संरक्षण झाले आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली.

नुकतेच केंद्र सरकारने एक निर्णय घेऊन प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सिलेंडरची किंमत ही अजून दोनशे रुपयांनी कमी केलेली आहे.
त्यामुळे आता गॅस सिलेंडर गरीब कुटुंबांना वापरणे सोपे झाले आहे

Leave a Comment