Viral video a groom crying लाखात एक नवरा भेटायला भाग्य लागतं, हे वाक्य तुम्ही आजपर्यंत अनेक महिलांच्या तोंडून ऐकलं असेल; ही गोष्टी तितकीच खरीदेखील आहे. प्रेमात अनेक जण पडतात, नातं निभावतात, आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्नही करतात. पण, दहात एखादा पुरुष असा असतो, जो होणाऱ्या बायकोच्या शारीरिक सौंदर्याकडे न पाहता तिच्या मनाचे सौंदर्य पाहतो. खरं तर, यालाच खरं प्रेम म्हणतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
कारण प्रेम जेव्हा शरीर, सौंदर्य, पैसा, प्रतिष्ठा बघून केलं जातं तेव्हा ते फक्त आकर्षण असतं आणि जिथे आकर्षण असतं तिथे शरीर, सौंदर्य, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी त्या व्यक्तीकडे असेपर्यंतच असू शकतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका खऱ्या प्रेमाचा सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
लग्नसराईचे दिवस म्हटले की, सोशल मीडियावरही लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओंमध्ये वरातीमधील डान्स, वधू-वराची एन्ट्री पाहायला मिळते; तर काही व्हिडीओमध्ये लग्नातील गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. शिवाय अनेकदा लग्नातील काही भावनिक क्षणदेखील पाहायला मिळतात. आता असाच एक भावनिक क्षण दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्न मंडपामध्ये वर स्टेजवर उभा राहिला असून यावेळी वधू तिच्या आई-वडिलांबरोबर स्टेजजवळ येताना दिसतेय. यावेळी वधूला पाहून वर खूप भावनिक होतो आणि रडायला सुरुवात करतो. त्यानंतर वधू स्टेज खाली उभी राहून त्याला फ्लाइंग किस देते. त्यानंतर दोघांचा विवाह सोहळा संपन्न होतो. या व्हिडीओमध्ये वराचं वधूबद्दल वाटणारे प्रेम पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.